तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
पुणे :- सिगारेट घेण्यासाठी आईने २० रुपये दिले नाही, म्हणून थोरल्या मुलाने लाकडी बाबुंने आपल्या आईच्या हाताचे मनगटावर जोरात मारुन त्यांचा हात फ्रैक्चर केल्याचा प्रकार कोंढव्यात घडला.
याबाबत सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५३९ / २३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव राजाराम कांबळे (वय २७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असताना त्यांचा मोठा मुलगा माधव कांबळे याने त्यांच्याकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले. त्यांनी न दिल्याने त्याने आरडाओरडा केला.तेव्हा फिर्यादी यांचा लहान मुलगा शंकर याने त्याला बाहेर जा, असे सांगितले. तेव्हा माधव हा बाहेरुन लाकडी बांबु घेऊन आला. त्याने फिर्यादी यांच्या हाताचे मनगटावर जोरात मारला. त्यात त्यांचा हात फ्रैक्चर झाला. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.