विद्यार्थी आधार प्रमाणीकरणासाठी अल्टिमेटम, शिक्षण विभागाकडून कारवाईची छडी

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

एनआयसी, पुणे कडील सरल प्रणालीतील स्टुडंट पोर्टलवर नोंदविल्या गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या आधार अद्ययावतीकरणाचे काम वेळोवेळी मुदतवाढ देऊनही शाळांकडून पूर्ण न झाल्याने अखेर जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून आता या कामासाठी ३१ मेपर्यंतचा अल्टिमेटम शाळांना गुरुवारी (दि. २५) दिला. मुदतीत शालेय विद्यार्थी आधार अद्ययावतीकरण शंभर टक्के पूर्ण न झाल्यास शालेय वेतन अनुदान थांबविण्याची कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा शिक्षण विभागाने शाळांना दिला आहे.

विभागातील शालेय विद्यार्थी आधार प्रमाणीकरण प्रगतीबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बैठकीत सूचना दिल्या. त्यानंतर नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांनीही गुरुवारी (दि.२५) नाशिक विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात विद्यार्थी आधार प्रमाणीकरणाचे काम असमाधानकारक असल्याची बाब उघड झाली.

या बैठकीनंतर जिल्हा परिषदेचे माध्यामिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना या कामासाठी ३१ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत ज्या शाळा विद्यार्थी आधार प्रमाणीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण करणार नाहीत अशा शाळांवर शालेय वेतन अनुदान थांबविण्याची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा पाटील यांनी शाळांना दिला आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक पावित्र्यामुळे विद्यार्थी आधार प्रामाणिकरणाचे काम अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील शाळांचे आता धाबे दणाणले आहे. नाशिक मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी देखील महापालिका हद्दीतील ५४२ शाळांना विद्यार्थी आधार प्रमाणीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे आदेश बजावले होते. तसेच हे काम पूर्ण न करणाऱ्या आणि आधारबाबतचा प्रगती अहवाल सादर न करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन थांबविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील शाळांमधील ८५.४२ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम झाले आहे. अद्यापही १४.५८ टक्के विद्यार्थी आधार प्रमाणीकरण बाकी आहे. यासाठी २८ फेब्रुवारी ही शासनाने अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर मुदतवाढ मिळूनही शाळांनी हे काम पूर्ण केले नसल्याची बाब आढावा बैठकीत समोर आल्याने शिक्षण विभागाने कारवाईची छडी उगारली आहे.

आधार प्रमाणीकरण प्रगती (नाशिक मनपा)

गट- अ-अनुदानित शाळा-

विभाग—शाळा संख्या—एकूण विद्यार्थी संख्या—आधार प्रमाणित—आधार प्रमाणित नसलेले

यूआरसी-१—१५१—१०१०६८—९२०५०—९०१८

यूआरसी-२—१४६—७२००१—६४८३२—७१६९

एकूण—२९७—१७३०६९—१५६८८२—१६१८७

गट- ब-विनाअनुदानित शाळा-

विभाग—शाळा संख्या—एकूण विद्यार्थी संख्या—आधार प्रमाणित—आधार प्रमाणित नसलेले

यूआरसी-१—१३०—५९९३३—४७९५१—११९८२

यूआरसी-२—११५—७०६७४—५४५७०—१६१०४

एकूण—२४५—१३०६०७—१०२५३१—२८०८६

Source link

Aadhaar authenticationCareer NewsEducation Departmenteducation newsMaharashtra Timesstudent Aadhaar authenticationअल्टिमेटमविद्यार्थी आधार प्रमाणीकरणशिक्षण विभाग
Comments (0)
Add Comment