नवी दिल्ली : Airtel Recharge Plans : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांच्या विविध गरजा पूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी कायम तत्पर असते. कंपनी कायमच अशा अनेक योजना प्रदान करत असते, ज्या वापरकर्त्यांना कमी खर्चात चांगले फायदे देतात. या प्लान्समध्ये अमर्यादित इंटरनेट, हाय-स्पीड 5G डेटा पॅक यांसारखे फीचर्स असतात. यासोबतच मोफत ओटीटी सबस्क्रिप्शनही दिले जात आहेत. विशेष म्हणजे एअरटेल २०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या अनेक योजना पुरवत आहे ज्याचे अनेक फायदे आहेत. याच तीन प्लान्सबद्दल पाहूया…
Airtel १५५ रुपयांचा प्लान: या प्लानची वैधता २४ दिवस आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS आणि 1GB डेटा दिला जात आहे. याशिवाय हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा अॅक्सेसही दिला जात आहे.
Airtel १५५ रुपयांचा प्लान: या प्लानची वैधता २४ दिवस आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS आणि 1GB डेटा दिला जात आहे. याशिवाय हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा अॅक्सेसही दिला जात आहे.
Airtel १७९ रुपयांचा प्लान: यामध्ये २८ दिवसांची वैधता दिली जात आहे. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 300 SMS आणि 2GB डेटा दिला जात आहे. त्याच वेळी, हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा अॅक्सेसही दिला जात आहे.
Airtel १९९ रुपयांचा प्लान: यामध्ये ३० दिवसांची वैधता दिली जात आहे. यासोबतच STD आणि रोमिंग नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 300 SMS हे फायदेही दिले जात आहेत. याशिवाय 3GB डेटा दिला जात आहे. त्याच वेळी, हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा अॅक्सेसही दिला जात आहे.
कसा कराल रिचार्ज?
वापरकर्ते एअरटेलच्या अधिकृत वेबसाइटद्वारे रिचार्ज करू शकतात. त्याच वेळी, तुम्ही Airtel Thanks अॅपद्वारे देखील रिचार्ज करू शकतात. रिटेल स्टोअरला भेट देऊन देखील तुम्ही हे रिचार्ज करु शकता.
वाचा : Apple iPhone 15 चे स्पेसिफिकेशन्स लीक, लाँचिंगआधीच जाणून घ्या डिटेल्स