डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निमयित विद्यार्थ्यांची परीक्षा ३१ मेपासून सुरू आहेत आहे. सुरुवातीला एमएस्सी अभ्याक्रमाची परीक्षा सुरू होणार आहे. एमएसह व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. मागील आठवड्यातील सुधारित वेळापत्रकाप्रमाणे सहा जूनला व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील, असे सांगण्यात आले. आठवडाभरातच पुन्हा वेळापत्रकात बदल करण्यात आले.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होत नसल्याचे समोर येत आहे. परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर आली असताना पुन्हा वेळापत्रकात बदल करण्यात आले. आठवडाभरापूर्वी ३१ मेपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या सहा जूनपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु यात आता सुधारणा करण्यात आली. परीक्षा दोन दिवसांवर आली असताना वेळापत्रकातील बदलामुळे प्रशासकीय गोंधळ समोर आला. यापूर्वी दोन वेळा बदल करण्यात आले आता पुन्हा बदल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा ठरत असल्याचे सांगण्यात येते.
सुधारित वेळापत्रकाप्रमाणे एमएस्सी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ मे, एमकॉम परीक्षा सहा जूनपासून सुरू होणार आहेत. एमए व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. दोन्ही मिळून ३२ अभ्यासक्रमांसाठी ७८ केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. चार जिल्ह्यांतीलमध्ये ही परीक्षा होणार असून, यामध्ये सर्वाधिक ३१ केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात आहेत तर बीड जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. जालना व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३ केंद्रे आहेत, अशी माहिती परीक्षा विभागातील उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
चार जिल्ह्यांत ७८ केंद्रांवर परीक्षा
पदवी अभ्यासक्रमाच्या २१ मार्च ते १६ एप्रिल या काळात घेण्यात आल्या. उत्तरपत्रिका मूल्याकंनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासह पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. एमए, बीएड, बीपीएड, एमएड, एमपीएड, एलएलबी, एलएलएम, एमबीए, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ जूनपासून सुरू होणार. सध्या १६ मेपासून ‘जून २०१५’च्या पॅटर्नप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा चार जिल्ह्यांत सुरू आहेत. त्यासाठी ७८ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली.