नवी दिल्ली :WhatsApp Status Feature: व्हॉट्सॲप हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप असून आजकाल व्हॉट्सॲपचा वापर फारच वाढला आहे. वाढता वापर आणि वाढते युजर्स यामुळे कंपनी देखील आपल्या युजर्सच्या सोयीकरता नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे.आता देखी कंपनी एक खास असं स्टेटस अर्काइव्ह (Status Archive Feature) हे फीचर आणणार आहे. हे फीचर सध्यातरी Android वरील बिजीनेस अकाउंट्ससाठी येत असून सध्या ते चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म ट्रॅकर WABetaInfo नुसार येत्या आठवड्यात हे फीचर अधिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. व्हॉट्सॲपने बीटा टेस्टिंगसाठी स्क्रीन शेअरिंग हे खास फीचरही लाँच केले होते.
स्टेटस अर्काइव्ह फीचर
मेसेजिंग प्लॅटफॉर्म स्टेटस टॅबमध्ये सुधारणा करण्यावर सध्या काम करत आहे. एकदा हे नवीन स्टेटस अर्काइव्ह फीचर रिलीज झाल्यानंतर, युजर्सना स्टेटस टॅबमध्ये नोटिफिकेशन बॅनर मिळेल. या फीचरच्या मदतीने २४ तासांनंतरही स्टेटस पाहता येणार आहे. तर स्टेटस एकदा एखाद्या युजरने पोस्ट केलं की ते अर्काईव्ह करता येईल आणि हे सेव्ह स्टेटस २४ तासांनंतरही आपल्याला पाहता येणार आहे.

वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन
व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअरिंगचं फीचरही येणार
व्हॉट्सॲपने अलीकडेच बीटा चाचणीसाठी व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगचे खास फीचर जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल करताना कॉलवरील इतर सहभागी असणाऱ्यांना त्यांच्या स्क्रीनला शेअर करण्याची म्हणजेच त्यांच्या फोनची स्क्रिन दाखवण्याची सुविधा मिळेल. स्क्रीन शेअरिंग हे एक असे फीचर आहे, जे सध्या झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्काईप सारख्या ॲप्सवर आहे. जे ऑफिस युजसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
वाचा : अनोखा आहे ‘हा’ AC, कुठेही जाल तिथे सोबत घेऊन जा, किंमत ७ हजारांपेक्षा कमी