unknown car found: शिवसेना आमदाराच्या कार्यालयासमोर ५ दिवसांपासून उभी होती ‘ती’ कार; बॉम्ब शोधक पथक आले आणि…

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर गेल्या ५ दिवसांपासून उभी होती एक अज्ञात सुमो कार.
  • स्फोटके असल्याचा अंदाज आल्याने तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
  • मात्र, या कारमध्ये फटाके असल्याचे बॉम्ब शोधक पथकाला आढळले.

मुंबई: पश्चिम उपनगरातील दहिसर येथील अशोक वन परिसरात शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर गेल्या ५ दिवसांपासून एक अज्ञात सुमो कार आढळल्याने खळबळ उडाली. या कारमध्ये स्फोटके असल्याचा संशय आल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. मात्र, तपासाअंती या कारमध्ये फटाके असल्याचे निष्पन्न झाले. (a unknown car having firecrackers found outside the office of shiv sena mla prakash surve)

१५ ऑगस्ट, अर्थात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही कार आढळल्यानंतर तिची पाहणी केली असता कारमध्ये स्फोटकेसदृश्य वस्तू दिसल्याने खळबळ उडाली. त्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी तातडीने पोलिसांनी माहिती दिली. तातडीने पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास केला असता या कारमध्ये फटाके असल्याचे स्पष्ट झाले.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील करोना रुग्णांच्या दुपटीचा दर ५ वर्षांवर; काय आहे ताजी स्थिती?

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर दरवर्षी मोठा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा होतो. या सोहळ्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित राहत असतात. त्यामुळे या कारबाबत संशय अधिकच बळावला होता. या कारची पाहणी केल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने या बॉक्समध्ये फटाके असल्याचे सांगितले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

क्लिक करा आणि वाचा- काहीसा दिलासा; आज करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मात्र…

अशी पटली कारच्या मालकाची ओळख

या सुमोच्या मालकाची ओळख पटली असून त्याचे नाव बोबडे असे आहे. बोबडे हे जवळच्या इमारतीत राहतात. पोलिसांना कारमध्ये पेटीएमचा क्यूआर कोड आढळला. तो स्कॅन केल्यानंतर मालकाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी बोबडे यांना पोलिस ठाण्यात बोलावले. आपला फटाक्यांचा व्यावसाय असून आपण रस्त्यावर फटाके विकण्याचे काम करतो. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने फटाके भिजू नयेत यासाठी आपण फटाके कारमध्ये ठेवतो, अशी माहिती बोबडे यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी तपास करून योग्य ती कारवाई करतील अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कोरोना लसीकरणात ‘अशी’ विक्रमी कामगिरी

Source link

car having firecrackersmla prakash surveShiv Sena MLA Prakash Surveअज्ञात कारआमदार प्रकाश सुर्वेफटाक्यांनी भरलेली कार
Comments (0)
Add Comment