200MP कॅमेरा, 256GB स्टोरेज, Realme 11 Pro सिरीज ८ जून रोजी भारतात होणार लाँच

नवी दिल्ली :Realme 11 Pro and Realme 11 Pro+ Phones : आघाडीची स्मार्टफोन कंपनी Realme ची एक नवीन सिरीज भारतात लाँच होत आहे. Realme 11 Pro मालिका भारतात ८ जून रोजी लाँच होणार असून कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली असून या सिरीजअंतर्गत Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे दोन फोन लाँच होत आहेत. कर्व्ह डिस्प्ले, दमदार स्टोरेज, मोठी बॅटरी आणि भारी कॅमेरासह येत आहेत. Realme 11 Pro+ मध्ये तर तब्बल २०० मेगापिक्सल्सपर्यंतचा प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे. चला तर या Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ च्या लाँचिंगसह इतर माहिती जाणून घेऊ…

Realme 11 Pro मालिका कधी होणार लाँच
भारतात ८ जून रोजी दुपारी १२ वाजता ही रिअलमी ११ प्रो मालिका लाँच होईल. कंपनीने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. फ्लिपकार्टवर या फोनसाठी एक वेगळं खास असं लँडिंग पेज देखील तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे फ्लिपकार्टवर तुम्ही हा फोन घेऊ शकणार आहात.

Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ ची संभाव्य फीचर्स
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ ड्युअल-सिम सपोर्टसह येतात. हे फोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतात. यात ६.७ इंचाचा फुल-एचडी + (1080×2412 पिक्सेल) कर्व्ह डिस्प्ले आहे. तसंच MediaTek Dimensity 7050 SoC प्रोसेसरने हे फोन सुसज्ज असून तब्बल 12 GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. प्रो मॉडेलमध्ये OIS सह १०० मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे, जो f/1.75 अपर्चरसह सुसज्ज आहे. यात f/2.4 अपर्चरसह २ मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देखील आहे.
दुसरीकडे Pro+ बद्दल बोलायचे झाले तर यात तब्बल २०० मेगापिक्सलचा Samsung HP 3 सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे आणि तिसरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. Realme 11 Pro आणि Realme 11 Pro + मध्ये अनुक्रमे १६ मेगापिक्सल आणि ३२ मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्स इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहेत. यामध्ये अनुक्रमे 67W आणि 100W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.

वाचा : स्वस्तात iPhone घेण्याची संधी, ३२ हजारपेक्षाही कमी किंमत, Amazon वर सुरु आहे ऑफर

Source link

realme 11 pro plusrealme 11 pro seriesrealme 11 pro+realme phoneरिअलमी फोन्सरिअलमी ११ प्रोस्मार्टफोन्स
Comments (0)
Add Comment