WhatsApp चे फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणार नाहीत, फक्त ‘ही’ सोपी ट्रिक करावी लागेल फॉलो

नवी दिल्ली :WhatsApp Chat Feature : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर फक्त चॅट करण्यासाठी अर्थात मेसेजस पाठवण्यासाठीच नाही तर बऱ्याच आणखी गोष्टींसाठीही वापर केला जातो. व्हॉट्सॲप वर मेसेजसोबतच फोटो, व्हिडीओ,कागदपत्र अर्थात डॉक्यूमेंट्सही पाठवता येतात. इतक्या अधिक आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जात असल्याने प्रायव्हसी आणि सुरक्षेसाठी कंपनी बरेच फीचर आणत असते. अशाच एका खास फीचरबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.व्हॉट्सॲपवर जर तुम्ही ऑटो-डाऊनलोड हा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला व्हॉट्सॲपवर जे देखील फोटोज किंवा व्हिडीओज येतात ते आपोआप डाऊनलोड होतात. त्यामुळे आपल्याला नको असलेले फोटोज आणि व्हिडीओजही थेट आपल्या गॅलरीमध्ये जातात. अनेकदा एखादा खाजगी फोटो किंवा व्हिडीओ थेट गॅलरीत जाणं आपल्याला पसंत नसेल तर यासाठी काय करावं लागेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही सोपी ट्रिक वापरा

जर तुम्हाला एखाद्या ग्रुप किंवा चॅटमधील फोटो किंवा व्हिडीओ थेट गॅलरीमध्ये जाऊ नये असं वाटतं तर तुम्हाला त्या स्पेसफिक ग्रुप किंवा चॅटमध्ये जाऊन Visibility बदलावी लागेल. हे करण्याकरता तुम्हाला खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर मेन स्क्रिनवर सर्वात वर असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन Chats ऑप्शन निवडावा लागेल
  • त्यानंतर चॅट्समधील सेटिंग्समध्ये Media Visibility हा ऑप्शन दिसेल. त्याला डिसेबल करावं लागेल. ज्यानंतर फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणं बंद होईल.

ठराविक व्हॉट्सॲप चॅट्स आणि ग्रुप्ससाठी

  • या पद्धतीतही आधी व्हॉट्सॲप ओपन करुन जे चॅट किंवा ग्रुपसाठी ही सेटिंग करायची आहे, तो ओपन करा.
  • त्यानंतर संबधित ग्रुप किंवा चॅटच्या नावावर क्लिक करुन Chat Info वर क्लिक कर
  • त्याठिकाणी Media Visibility हा ऑप्शन दिले. त्यावर क्लिक केल्यावर Default(Yes), Yes आणि No हे ऑप्शन दिसतील.
  • त्यातील तिसरा No हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला त्या ठराविक चॅटमधील फोटो आणि व्हिडीओ तुमच्या परवानगीशिवाय गॅलरीत दिसणार नाहीत.

वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब

Source link

WhatsAppWhatsApp mediawhatsapp message whatsapp newswhatsapp tipsWhatsapp tricksव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप चॅटव्हॉट्सॲप फीचर
Comments (0)
Add Comment