Google ने ‘या’ ॲप्सवर घातली बंदी, फोनमध्ये असतील तर लगेचच करा डिलीट

नवी दिल्ली :Google Company : गुगलने ऑनलाइन पर्सनल लोन ॲप्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे ३१ मे नंतर कर्ज देणारे हे ॲप आता वापरता येणार नाहीत. गुगल या आपल्या नियमाची कडक अंमलबजावणी करणार आहे. या ॲप्सवर ग्राहकांना खोटे दावे करून चुकीच्या पद्धतीने कर्ज वसूल केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच गुगलने पर्सनल कर्ज देणाऱ्या या ॲप्ससंबधी नियमांमध्ये बदल केला आहे आणि थेट या ॲप्सवर बंदी घातली आहे. या ॲप्सवर वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरून ती वैयक्तिक माहिती चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुलीसाठी वापरल्याचा आरोप आहे. तर आता लोनिं ॲप्सना फोटो आणि कॉन्टॉक्ट डिटेल्ससारख्या संवेदनशील ॲप्समध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित केलं आहे. गुगलच्या रिपोर्टनुसार, हे नियम कर्ज देणाऱ्या ॲप्सना सध्या लागू होतील, जे थेट कर्ज देतात.Google ने २००० हून अधिक ॲप्स काढून टाकले
जर आपण भारताबद्दल बोललो तर येथे कोणत्याही ॲपला वैयक्तिक कर्ज देण्याची परवानगी नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून परवाना असणारे ॲप्सचं वैयक्तिक कर्ज देऊ शकतील. या प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुगलकडून उत्तर मागितले होते, ज्याच्या उत्तरात गुगलने सांगितले की, असे सुमारे २००० ॲप्स आपल्या बाजूने काढून टाकण्यात आले आहेत. तसेच, प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील कारवाई केली जाईल.
वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन

‘ही’ चूक करु नकाआ सरता
वापरकर्त्यांनी नेहमी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसे पर्सनल लोनलंबघी ॲप्स कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्सद्वारे डाउनलोड करू नयेत.
कर्ज देणारे ॲप्स देखील विनाकारण वापरू नयेत. यामुळे तुमची बॅटरीही संपू शकते.

वाचा : अनोखा आहे ‘हा’ AC, कुठेही जाल तिथे सोबत घेऊन जा, किंमत ७ हजारांपेक्षा कमी

Source link

googlegoogle bans appsgoogle newsloan appsगुगल बॅनगुगल ॲप्स
Comments (0)
Add Comment