विद्यार्थ्यांचा कल व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे!

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदवी कॉलेजमधील प्रवेशासाठी यंदाही सेल्फ फायनान्स या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. बीएमएस बीएफएम, बीएएफ, बीएससी आयटी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे यंदाही या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चुरस दिसणार आहे.

विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजांमधील विविध अभ्यासक्रमांसाठी केवळ पाच दिवसांमध्ये सुमारे ८५,४४९ विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत अर्ज सादर केले आहेत. विद्यापीठाने २७ मेपासून प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. विद्यापीठातील कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी पाच दिवसांत सुमारे ६४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विद्यापीठाच्या अखत्यारितील कॉलेजांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांकडे मोर्चा वळविलेला आहे. त्यातून या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिक स्पर्धा असल्याचे चित्र आहे.

स्वायत्त कॉलेजमधील बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुमारे १९ हजार विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत अर्ज सादर केले होते. त्याखालोखाल बी. कॉम अभ्यासक्रमाला १३ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी, बॅचरल ऑफ अकाऊंट अँड फायनान्स (बॅफ) अभ्यासक्रमाला १० हजार ७९९, बीएससी आयटी अभ्यासक्रमासाठी ९ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून आणखी अर्ज सादर केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल कमी लागला असला तरी सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धा राहणार आहे.

सर्वाधिक अर्ज आलेले अभ्यासक्रम

बीएमएस : १८,९९९

बीकॉम : १३,४२१

बीकॉम (ए अॅड एफ) : १०,७९९

बीएससी : ३,६५१

बीएससी बायोटेक्नॉलॉजी : २,२००

बीएससी आयटी : ९,३१६

बीएससी कम्प्युटर सायन्स : ४,२१६

बीए : ७,८३५

बीए एमएमसी : ५,६७१

प्रवेशासाठी असलेल्या जागा

बीकॉम : १,०१,८५४

बीए : ४०,१८५

बीएससी : २३,१९९

बीएमएस : २२,८५१

बीकॉम (स्वायत्त) : १९,५४१

बीएससी (आयटी) : १६,९७२

बीकॉम (ए अँड एफ) : १५,८२५

बीएससी (स्वायत्त) : ९,७६८

बीए एमएमसी : ९,५३६

बीएससी सीएस : ८,७२५

बीए : ८,१५४

बीकॉम बीआय : ७,९४३

बीएमएस (स्वायत्त) : ५,२५५

बीकॉम एएफ (स्वायत्त) : ४,०९५

बीएससीआयटी (स्वायत्त) : ३,५२६

बीएससी सीएस (स्वायत्त) : २,३०८

बीकॉम बीआय (स्वायत्त) : १,८४८

प्रवेश प्रक्रिया अशी असेल

– १२ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत

– १२ जूनपर्यंत कॉलेजमधून बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे (इनहाऊस) प्रवेश. तसेच अल्पसंख्यक कोट्यातील प्रवेश.

– १९ जून पहिली प्रवेश यादी जाहीर होणार.

– २० ते २७ जून ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्काचा भरणा करण्याची मुदत

– २८ जून द्वितीय प्रवेश यादी जाहीर होणार

– ३० जून ते ५ जुलै ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्कभरणा करण्याची मुदत

– ६ जुलै तृतीय प्रवेश यादी जाहीर होणार

– ७ जुलै ते १० जुलै ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्कभरणा करण्याची मुदत

Source link

Career GrowthCareer TipsMaharashtra Timesvocational coursesबीएमएसबॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजव्यावसायिक अभ्यासक्रम
Comments (0)
Add Comment