फक्त ५५० रुपयांना विकत घ्या POCO X5 5G, ऑनलाईन खरेदीवर सुरु आहे ही भन्नाट ऑफर

नवी दिल्ली :POCO X5 5G : बजेट स्मार्टफोन तयार करणारी एक आघाडीची कंपनी म्हणजे पोको. तर Poco कंपनीच्या स्मार्टफोनला नेहमीच मागणी असते. जर तुम्हीही पोको कंपनीचा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एक खास ऑफर असणाऱ्या एका खास मॉडेलबद्दल सांगणार आहोत. तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत POCO X5 5G बद्दल…तुम्ही Flipkart वरून POCO X5 5G (128GB+6GB RAM) खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत २०,९९९ रुपये आहे आणि तुम्ही २३% डिस्काउंटनंतर १५,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. पण तुम्हाला बँक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी नेमके खास कार्ड असणं आवश्यक आहे. तर या फोनच्या खरेदीदरम्यान तुम्ही हा फोन एक्सचेंज ऑफर अंतर्गत सर्वात स्वस्तात मिळवू शकता. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी १५,४५० रुपयांची सूट मिळू शकते. पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवरही किंमत अवलंबून असते.
तुम्ही हा फोन एका वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करू शकता.

वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन

POCO X5 5G चे फीचर्स
या फोनच्या स्पेसिफिकेशनचा विचार केला तर या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP मिळत आहे. म्हणजेच मागच्या कॅमेऱ्यात तुम्हाला भारी फोटो काढता येतील. यासोबतच यामध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यात 5000mAh ची बॅटरी मिळत आहे. यासोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देखील दिला जात आहे.

वाचा : अनोखा आहे ‘हा’ AC, कुठेही जाल तिथे सोबत घेऊन जा, किंमत ७ हजारांपेक्षा कमी

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

poco 5gpoco phone offerpoco pricepoco x5पोको एक्स५ ५जीपोको फोनस्मार्टफोन
Comments (0)
Add Comment