अभ्यासक्रमातून ‘लोकशाही’ हद्दपार; ‘एनसीईआरटी’ने दहावीच्या पुस्तकातून वगळला धडा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) आता लोकशाही या विषयाशी संबंधित दहावीच्या (बोर्ड परीक्षेसाठीच्या) पुस्तकातील पूर्ण धडा वगळला आहे. यापूर्वी बारावीचा इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकांतील काही वादग्रस्त बदलांपाठोपाठ आता दहावीच्या अभ्यासक्रमातही वादंग व्हावे, अशी काटछाट सुरू झाली आहे.‘एनसीईआरटी’ने गुरुवारी (एक जून) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोव्हिड-१९ साथीनंतर विद्यार्थ्यांवरील पाठ्यक्रमाचे ओझे कमी करण्यासाठी दहावीच्या पुस्तकातील लोकशाही, राजकीय पक्ष (संपूर्ण धडा) आणि लोकशाहीसमोरील आव्हाने याबाबतचे पूर्ण प्रकरण अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून (एप्रिल २०२३ व जूनपासून पुढे ) हा बदल लागू होईल.

याच आठवड्यात या संस्थेच्या पाठ्यक्रमांतून खलिस्तानबाबतचा धडा वगळला गेला. नंतर सावरकरांच्या जीवनाशी संबंधित प्रकरणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता.
Mumbai Crime : मुंबईत प्रेयसीच्या २० वर्षीय मुलीला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; तरुणीचा मृत्यूशी संघर्ष
आवर्त सारणीही गायब

नवी दिल्ली : चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तानंतर आता ‘एनसीईआरटी’ने अभ्यासक्रमातून मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा धडाही वगळला आहे. इयत्ता अकरावीच्या पुस्तकात मात्र हा धडा सविस्तर स्वरूपात आहे. तज्ज्ञांच्या शिफारशींनुसारच हे बदल केले जात असल्याचे ‘एनसीईआरटी’चे म्हणणे आहे.

Source link

10th books syllabusChallenges to DemocracydemocracyNCERTSkipped Chapter On Democracy In Class 10th Book
Comments (0)
Add Comment