मुंबईतील करोना रुग्णांच्या दुपटीचा दर ५ वर्षांवर; काय आहे ताजी स्थिती?

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत मुंबईत २६२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज मुंबईत एकूण ६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येत किचिंतशी घट झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात एकूण २६२ करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या २८५ इतकी होती. तर गेल्या २४ तासांत एकूण ३२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी वाढली असून काल बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २६१ इतकी होती. तर, आज एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १७ हजार ७७५ इतके रुग्ण बरे झाले आहेत. याबरोबरच बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्ण, म्हणजेच ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या २ हजार ८७९ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- काहीसा दिलासा; आज करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मात्र…

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १ हजार ८६० दिवसांवर पोहोचला असून कोविड दरवाढीचा दर (७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट) हा ०.०४ टक्के इतका आहे.

मुंबई आज झाल्या एकूण ३६ हजार ४७१ चाचण्या

मुंबईत एकूण ३६ हजार ४७१ इतक्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ८६ लाख १६ हजार ५५५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कोरोना लसीकरणात ‘अशी’ विक्रमी कामगिरी

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – २६२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ३२३
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१७७७५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- २८७९
रुग्ण दुपटीचा कालावधी- १८६० दिवस
कोविड वाढीचा दर (०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट)- ०.०४ %

क्लिक करा आणि वाचा- महापुरामुळे एकट्या कोल्हापुरात ‘इतक्या’ कोटींचे नुकसान; सरकारने किती दिले अनुदान?

Source link

corona updatescoronavirus in mumbaiCoronavirus latest updatescovid-19करोनाकरोना अपडेटकोविड-१९मुंबईतील करोनाची स्थिती
Comments (0)
Add Comment