SSC Result 2022 : असा पाहा निकाल
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
निकाल जाहीर झाल्यानंतर हे सर्वजण अधिकृत वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे काही वेळासाठी बोर्डाची वेबसाइट हॅंग होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना आपल्या निकालाबद्दल आधीच धाकधूक असते. त्यात वेबसाइट हॅंग झाल्यावर विद्यार्थी अधिक गोंधळून जातात. पण अशावेळी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
कारण वेबसाइट हॅंग झाली तरी तुम्हाला तुमचा निकाल मोबाइलवर देखील कळू शकणार आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी एसएमएस सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दिलेल्या क्रमांकावर एक एसएमएस पाठवा आणि काही मिनिटातच निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसू शकेल.