निकालानंतर गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जून, छायाप्रतीसाठी ३ ते २२ जून या कालावधीत अर्ज करता येईल. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७ जूनपासून नोंदणी करता येणार आहे.
पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.