WhatsApp वापरताना चुकूनही ‘त्या’ लिंकवर क्लिक करु नका, नाहीतर ॲप होईल क्रॅश

नवी दिल्ली :Whatsapp हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲप कंपनी युजर्सना अगदी खास आणि सुरक्षेच्या दृष्टाने दमदार फीचर्स पर्याय उपलब्ध करुन देते. पण असं असलं तरी या व्हॉट्सॲपवरही बग येतच असतात. ज्यामुळे हे ॲप क्रॅश होऊ शकते. अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपला सध्या बगचा सामना करावा लागत आहे. हा बग वैयक्तिकरित्या किंवा विशिष्ट लिंकसह ग्रुपमध्ये येतो. या लिंकमुळे सध्या अँड्रॉईड डिव्हाईस क्रॅश झाल्याच्या तक्रारी येत आहेत.

कोणत्या व्हॉट्सॲप व्हर्जनवर होत आहे परिणाम?
रिपोर्ट्सनुसार, ही लिंक ज्या चॅटमध्ये आली आहे ते चॅट ओपन करुन यावर क्लिक करताच संपूर्ण व्हॉट्सॲप क्रॅश होत आहे. पण ॲप काही वेळात पुन्हा सुरू होते. हा हा बग Android साठी WhatsApp च्या व्हर्जन 2.23.10.77 वर परिणाम करत असल्याची नोंद आहे, तसंच इतर व्हर्जन्सवर देखील बगचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन

whatsapp बग कसा दुरुस्त करायचा?

जर तुम्हालाही ही ॲप क्रॅश होण्याची समस्या येत असेल, तर तुम्ही व्हॉट्सॲप वेब ब्राउझर व्हर्जन वापरु शकता. कारण या बगमुळे व्हॉट्सॲप वेबवर कोणताच परिणाम होत नाही. यासाठी तुम्ही WhatsApp वेबवर लॉग इन करू शकता आणि ज्या मेसेज अर्थात लिंकमुळे ॲप क्रॅश होत आहे तो मेसेज हटवू शकता. यानंतर जोपर्यंत तुम्हाला तीच फॉल्ट असणारी लिंक पुन्हा मिळत नाही तोपर्यंत WhatsApp क्रॅश होणार नाही. यासोबतच गुगल प्ले स्टोअरवरून तुमचे ॲप अपडेट करणेही एक चांगला उपाय आहे. तसंच कोणत्याच अनोळखी नंबरवरुन किंवा ओळखीच्या नंबरवरुनही संशयित लिंक ओपन करु नका.

वाचा : Vi Special Recharge : वोडाफोन आयडियानं आणला भन्नाट रिचार्ज, फक्त १७ रुपयांत मिळणार अमर्यादित डेटा

Source link

whasapp bugWhatsAppwhatsapp alertwhatssapp newsव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप बग
Comments (0)
Add Comment