Mangesh Chavan: बीएचआर घोटाळ्यात मला गोवण्याचे कारस्थान; भाजप आमदाराचा तातडीने खुलासा

हायलाइट्स:

  • बीएचआर प्रकरणात गोवण्याचे राजकीय कटकारस्थान.
  • भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले.
  • तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा माझा उद्देश नाही.

जळगाव:बीएचआर पतसंस्था प्रकरणात माझ्या नावाचा कुठलाही उल्लेख नसताना या प्रकरणात मला गोवण्यासाठी राजकीय कारस्थान करण्यात येत आहे. त्या उद्देशाने बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदार संघाचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ( BJP MLA Mangesh Chavan On BHR Scam )

वाचा:राज्यात उद्यापासून निर्बंध होणार शिथील; पुण्याला मिळाला ‘हा’ दिलासा

बीएचआर घोटाळा प्रकरणी मुख्य संशयीत सुनील झंवर यास अटक झाल्यानतंर आमदार मंगेश चव्हाण यांनी या तपासबाबत पोलिसांशी पत्रव्यवहार करून माहिती मागविल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणात नाव येत असल्याने त्याचा खुलासा करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जळगाव महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

वाचा: केंद्र सरकारला मोठा धक्का; ‘त्या’ आयटी नियमाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती

आमदार चव्हाण यांनी सांगितले की, रिमांडमध्ये माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. पतसंस्था खरेदी प्रकरणात किंवा पावती मॅचिंग प्रकरणात माझा आणि कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. मी उद्योजक आहे. बीएचआरकडून घेतलेले कर्ज कोणतीही सेटलमेंट न करता भरलेले आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणेने तपास करावा. जर त्यात काही तथ्य असेल तर कारवाई करावी, असे आव्हानही त्यांनी केले. कुणीतरी राजकीय कट कारस्थान रचून माझ्यासारख्या बहुजन समाजाच्या लोक प्रातिनिधीला अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हण यांनी केला. सुनील झंवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. ज्यांनी माझी बदनामी केली असेल तर त्यांच्या विरोधात मी रितसर कायदेशीर बाजूने तक्रार करणार आहे. ठेवीदारांना पैसे मिळविण्याचा प्रमुख उद्देश असताना ठराविक लोकांना अडकविण्याचा हा प्रयत्न आहे. अनेकांनी पावत्या मॅचिंग केल्या असताना ठराविक लोकांना अडकविण्याचे कटकारस्थान सरकारने आणि काही लोकांनी करू नये, असेही आमदार चव्हाण म्हणाले. मी अनेक प्रकरणात पत्रव्यवहार केला आहे. आजवर ६ हजार पत्रे माझ्या कार्यालयातून गेली आहेत. माझ्या मतदारसंघातील काही नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मी पत्रव्यवहार केला आहे. तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. तसे असेल तर मी केव्हाही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

वाचा: करोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येऊ शकते!; अजित पवारांनी दिला इशारा

याबाबत मी स्वतः आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहिणार आहे. तपास यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना भेटणार आहे. सुनील झंवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. मी मागितलेली माहिती अद्याप अपूर्ण असून ती पूर्ण मिळाल्यावर विधिमंडळात मांडणार आहे. कर्जदारांनी पैसे भरल्यावर ते ठेवीदारांना मिळतील, असे पसरवले जात आहे. मात्र, ते चुकीचे आहे. कर्जदारांनी सुरक्षेपोटी ती रक्कम न्यायालयात जमा केली आहे. अंतिम निकाल लागल्यावरच पुढील रक्कम ठेवीदारांना मिळणार आहे. त्यामुळे ठेवीदारांची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.

वाचा: आमदार नियुक्तीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्यपाल कोश्यारींना धक्का

Source link

bhr scam latest updatesbjp mla mangesh chavan latest newsmangesh chavan latest newsmangesh chavan on bhr scammangesh chavan sunil zanvar latest newsबीएचआर घोटाळाबीएचआर पतसंस्थाभाजपमंगेश चव्हाणसुनील झंवर
Comments (0)
Add Comment