नवी दिल्ली : iPhone Update : ॲपल कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट असेल तरी त्याची मार्केटमध्ये कायमच हवा असल्याचं दिसून येतं. आता देखील ॲपल लव्हर्स हे आयफोन १५ मालिकेबद्दल उत्साहित असून त्याप्रमाणेच iOS 17 अपडेटबद्द देखील तितकेच उत्साहित आहेत. ही नवीन अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टीम आयफोनमध्ये बग फिक्स आणि युजर एक्सपिरियन्स सुधारण्यासह आणखीही बरेच नवीन फीचर्स देखील आणू शकते. Apple ची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2023 ही ५ जूनपासून सुरू होणार आहे, जिथे Apple iOS 17, watchOS 10, iPadOS 17 आणि यासह आणखीही अनेक घोषणा कंपनी करु शकते. लेटेस्ट फोन्ससाठी iOS 17 फारच एक्ससाईटिंग असला तरी जुने iPhones ना या अपडेटमुळे प्रॉब्लेमही येऊ शकतो.
iOS 17 अपडेट
काही अहवालांनुसार, अनेक आयफोन्सना Apple चं हे लेटेस्ट iOS 17 अपडेट मिळण्याची शक्यता आहे. पण जुन्या काही आयफोन्सना हे अपडेट मिळणार नसल्याने ते निराश होऊ शकतात. Apple सध्या फ्लॅगशिप iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max पासून ते iPhone 12 आणि बजेट iPhone SE पर्यंत ८ वेगवेगळे iPhone मॉडेल्स विकते. कंपनीने नवीन आयफोन लाँच करताच जुने मॉडेल्स बंद केले आहेत. तर सध्या ॲपल आपल्या आयफोनला सुमारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी सपोर्ट अर्थात अपडेट्सदेत असते. एकदाका चिपसेट जुना झाला त्यानंतर हार्डवेअरमुळे लेटेस्ट iOS वर फोन नीट काम करत नाही.दरम्यान आगामी iOS 17 वर कोणते फोन्स सपोर्टेड असतील याबद्दल कंपनीने अद्याप काही सांगितलेले नाही.

‘या’ आयफोनना iOS 17 अपडेट न मिळण्याची शक्यता
अहवालानुसार, iPhone X हा iOS 17 न मिळणारा iPhone असू शकतो. विशेष म्हणजे iPhone X हा iPhone इतिहासातील आतापर्यंतचं सर्वात प्रभावशाली मॉडेल होतं. कारण त्याने Apple च्या डिझाइनमझ्ये मोठा बदल केला होता. जाड बेझलसह तसेच होम बटणाशिवाय या आयफोनचं अनावरण झालं होतं. ज्यामध्ये Apple चे स्वतःचे फेस आयडी तंत्रज्ञान देखील होते. पण आता इतर मॉडेल्सच्या तुलनेत हा फोन मागे पडला असल्याने या फोनला आता नवीन अपडेट मिळणार नाही.
वाचा : iPhone 13 वर भन्नाट ऑफर, थेट ३८,००० वाचवण्याची संधी, पाहा नेमकी ऑफर काय?