SSC Re exam: दहावी नापास झालात? टेन्शन सोडा आणि पुन्हा तयारीला लागा, सर्व प्रक्रिया समजून घ्या

Maharashtra Board 1oth Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा विभागनिहाय निकाल सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. यावर्षी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. नापास झालात तरी निराश होण्याचे कारण नाही.

विद्यार्थ्यांना लगतच्या दोनच संधी जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४ श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ७ जूनपासून मंडळाच्या वेबसाइटवरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

यासाठी आवश्यक अटी / शर्ती आणि सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी ३ जून ते १२ जून पर्यंत व छायाप्रतीसाठी ३ जून ते २२ जूनपर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येणार आहे.

मार्च २०२३ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळ अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source link

10th Exam Result10th Result 202310th result 2023 maharashtra board10th Student FailedDahavi napasdahavi nikal 2023Maharashtra 10th Result 2023Maharashtra SSC Result 2023SSC Board Result 2023SSC Exam Result 2023SSC FailedSSC maharashtra board result 2023SSC Re examinationSSC reexam applicationSSC Result 2023SSC result 2023 maharashtra boardSSC Result Linkदहावी नापासदहावी निकालदहावी रिझल्टदहावी रिझल्ट 2023दहावी रिझल्ट लींकदहावीचा निकाल
Comments (0)
Add Comment