तसं, अनेक थर्ड पार्टी ॲप्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही Instagram Reels डाउनलोड करू शकता. पण या थर्ड पार्टी ॲप्सवर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे कारण ते तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. पण असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय थेट तुमच्या फोनच्या गॅलरीत रील किंवा स्टोरी सेव्ह करू शकता.
वाचा : Twitter News : ट्वीटरनं २५ लाखांहून अधिक खात्यांना केलं बॅन, पाहा नेमकं कारण काय?
कसं कराल इन्स्टाग्राम स्टोरीज किंवा रील डाउनलोड?
- सर्व प्रथम तुम्हाला Instagram उघडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या रील डाउनलोड करायच्या आहेत त्यावर जावे लागेल.
- तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला शेअर आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा. मग एक मेनू उघडेल.
- नंतर तळाशी स्क्रोल करा. येथे तुम्हाला Add To Story चा पर्याय मिळेल.
- आता स्टोरीमध्ये रील एडजस्टकरा.
- नंतर शीर्षस्थानी असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा
- यामध्ये तुम्हाला सेव्हचा पर्याय मिळेल. त्यावर टॅप करा.
- त्यानंतर हा रील तुमच्या फोनच्या गॅलरीत आवाजासह सेव्ह होईल.
- त्यानंतर तुम्ही सेव्ह केलेल्या तुमच्या फोन गॅलरीत जाऊन तुम्ही या रिल्स पाहू शकाल.
वाचा : WhatsApp वापरताना चुकूनही ‘त्या’ लिंकवर क्लिक करु नका, नाहीतर ॲप होईल क्रॅश