पण हा संदेश पूर्णपणे खोटा आहे…
या घोटाळ्याबाबत अनेक रिएलटी चेक करण्यात आले आहेत. पीआयबीनेही याची सत्यता तपासली असून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना अशा कोणत्याही घोटाळ्याला बळी न पडण्याचा सल्ला दिला गेला आहे. भारत सरकार कोणत्याही विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप देत नाही.
काय आहे हा घोटाळा? कसं राहाल सेफ?
- जर तुम्हाला असा कोणताही बनावट मेसेज आला की ज्यामध्ये भारत सरकारला मोफत लॅपटॉप देण्याचे सांगण्यात आले असेल तर तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. असे दावे खोटे आहेत.
- कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नये. असे तपशील शेअर केल्याने तुमच्या माहितीचा गैरवापरही होऊ शकतो
- अशा बातम्यांची पुष्टी करण्यासाठी, सरकारची अधिकृत वेबसाइट तपासा ज्याबद्दल दावा केला गेला आहे. जर येथे तपशील नसेल तर तो एक घोटाळा आहे
- पोस्टर काळजीपूर्वक पहा. जर ते खोटे असेल तर तुम्हाला त्यात स्पेलिंग आणि वाक्यात चूक दिसेल.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा