दहावी निकालात शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विभागात ६४४ शाळांमधील शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागात शंभर टक्के निकाल असलेल्या शाळा ३८३ एवढ्या आहेत. ९० टक्क्यांपैकी अधिक गुण असलेल्य विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.
निकालात अनेक शाळांचा टक्का अधिक आहे. शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण असलेल्या शाळा शिक्षण मंडळाने जाहीर केल्या. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यात ६४४ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. एकूण शाळांमध्ये अशा शाळांची टक्केवारी २४.५१ टक्के एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर २२९, बीड २१५ तर जालना १०६, परभणी ६४ तर हिंगोलीतील ३० शाळांचा समावेश आहे. विभागात ९ शाळांचा निकाल शुन्य टक्के आहे.
लातूर विभागात सर्वाधिक १७६ लातूर जिल्ह्यातील शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. नांदेड ११४ तर धाराशिव जिल्ह्यातील ९३ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. एकूण शाळांच्या तुलनेत हे प्रमाण २१.१७ टक्के असे आहे. सात शाळांचा निकाल शुन्य टक्के आहे.
टक्केवारीनुसार विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यात ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी १९ हजार ६२४ आहेत. ८५ ते ९० टक्क्यांमध्ये गुण असलेले विद्यार्थी १५ हजार ९७२ तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९७४८ एवढी आहे.
लातूर विभागात ८० ते ८५ टक्के गुण असलेले १० हजार ३३०, ८५ टक्के ९० गुण असलेले ८ हजार ४६० विद्यार्थी आहेत. ९० टक्क्यांपेक्षा
अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार २२८ अशी आहे.
लातूर विभागात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले ७२२८
छत्रपती संभाजीनगर विभागात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले… ९७४८