सैकनिक यांनी दिलेल्या अहवालानुसार सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५.५० ते ६ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. विकीची प्रमुख भूमिका असलेला उरी द सर्जिकल स्ट्राइक सिनेमानंतर जरा हटके जरा बचके या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिम्बा, लव आज कल, केदारनाथ नंतर सर्वात जास्त कमाई कऱणारा साराचा हा चौथा सिनेमा आहे.
स्पायडर मॅन अक्रॉस द स्पायडर वर्सशी स्पर्धा
शुक्रवारी जरा हटके जरा बचके या सिनेमाला १९.६४ टक्के प्रतिसाद मिळाला. तर येत्या आठवड्यात या सिनेमाला प्रेक्षकांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा सिनेसमीक्षकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या सिनेमाला स्पायडर मॅन अक्रॉस द स्पायडर वर्स या सिनेमाशी स्पर्धा करावी लागणार आहे. या सिनेमानं गुरुवारी भारतात पहिल्याच दिवशी ४.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पहिल्या आठवड्यात होऊ शकते चांगली कमाई
जरा हटके जरा बचके या सिनेमानं हिंदीमध्ये ३.३५ कोटी रुपये कमावले आहेत. ट्रेंडनुसार विकी आणि सारा यांचा सिनेमा त्यांच्या आसपास प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेत कमी बजेटचा सिनेमा आहे. पहिल्या दिवशी सिनेमाला जो प्रतिसाद मिळाला आहे, तो आठवडाभर कायम राहिला तर पहिल्या आठवड्यात हा सिनेमा २२ते २५ कोटी रुपयांची कमाई करू शकतो.
काय आहे सिनेमात
जरा हटके जरा बचके या सिनेमात सारा अली खान आणि विकी कौशल यांनी विवाहित दांपत्याची भूमिका साकारली आहे. प्रेमविवाह केलेले हे जोडपे घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचते. त्यांचं लग्न धोक्यात आलं आहे. हे दोघांचं लग्न वाचतं का, त्यासाठी ते काय काय करतात ते या सिनेमात दाखवलं आहे. जियो स्टुडिओ आण दिनेश विजान यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा २ जून २०२३ ला प्रदर्शित झाला आहे.