FYJC Admission: अकरावीसाठी ४५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या आठ जूनपासून अर्जाचा भाग दोन म्हणजे कॉलेजांचे पसंतीक्रम भरावे लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. १९ जून रोजी प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून या कालावधीत कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत कोट्यांतर्गत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, आता नियमित ‘कॅप’ फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना १२ जूनपर्यंत अर्जातील भाग एक भरता येणार आहे, तर विद्यार्थ्यांना अर्जातील भाग दोन म्हणजेच कॉलेजांचे पर्याय हे १५ जूनपर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे १९ जूनला कॉलेजांच्या प्रवेशासाठी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून या कालावधीत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. त्यानंतर रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. साधारण २३ जूनपासून प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिक्षण सहसंचालक हरून आतार यांनी दिली. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आणि प्रवेशाचे भाग एक आणि दोन भरण्यासाठी https://pune.11thadmission.org.in/ या लिंकवर अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

– प्रवेश निश्चित करण्यापूर्वी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

– पसंतीक्रमात प्रथम क्रमांकाचे कॉलेज अॅलॉट झाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य.

– प्रवेश न घेतल्यास पुढील फेरीत सहभागी होत येणार नाही.

– प्रथम क्रमांकाच्या व्यतिरिक्त कॉलजे अॅलॉट झाल्यास पुढच्या फेरीची वाट पाहू शकता.

पुढील प्रवेश फेऱ्यांचे संभाव्य वेळापत्रक

दुसरी फेरी : २३ ते ३० जून

तिसरी फेरी : १ जुलै ते ९ जुलै

विशेष फेरी : १० ते १८ जुलै

Source link

11th Admission11th timetableFYJC AdmissionFYJC Online admissionMaharashtra TimesPune Admissionअकरावी नोंदणीअकरावी प्रवेश
Comments (0)
Add Comment