नवी दिल्ली : Apple iPhone 14 Dicount Offer : तुम्ही ॲपल कंपनीचा लेटेस्ट आयफोन १४ (Apple iPhone 14) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता एक उत्तम संधी आहे. iPhone 14 हा Apple चा लेटेस्ट स्मार्टफोन असून हा १४ सिरीजमधील सुरुवातीचा फोन आहे. दरम्यान हा Apple फोन बँक आणि कॅशबॅक ऑफरसह ई-कॉमर्स वेबसाइटवर स्वस्तात खरेदी करण्याची संधी सध्या आहे. आयफोन १४ फ्लिपकार्टवर ७०,९९९ रुपयांच्या मूळ किमतीत मिळत आहे. तर या iPhone 14 वर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्सबद्दल जाणून घेऊ…
iPhone 14 ऑफर
iPhone 14 128 GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ७०,९९९ रुपयांना ठेवण्यात आलं आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे फोन घेतल्यावर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. ईएमआय व्यवहारांद्वारे HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे फोन घेतल्यावर ४००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. हा फोन २,९५९ रुपये प्रति महिना विनाशुल्क EMI वर देखील घेतला जाऊ शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये हँडसेट घेतल्यावर ३३,००० रुपयांची सूट मिळेल. निवडक मॉडेल्सच्या एक्सचेंजवर अतिरिक्त ३,००० रुपये सूट मिळेल.

Apple iPhone 14 चे फीचर्स
Apple iPhone 14 स्मार्टफोनमध्ये 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये एचडीआर डिस्प्ले, ट्रू टोन, हॅप्टिक टच असे फीचर्स आहेत. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट प्रतिरोधक ओलिओफोबिक कोटिंग देण्यात आली आहे या
हँडसेटमध्ये १२ मेगापिक्सलचे दोन सेन्सर आहेत. फोनमध्ये १२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोन iOS 16 सह येतो. Apple iPhone 14 स्मार्टफोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. हा हँडसेट ड्युअल सिमला सपोर्ट करतो. स्मार्टफोन फेस आयडी, बॅरोमीटर, हाय डायनॅमिक रेंज गायरो, हाय-जी एक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, ड्युअल अॅम्बियंट लाइट सेन्सर यांसारखे सेन्सर देण्यात आले आहेत.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा