हा प्लान ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. ज्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे सर्वात विशेष गोष्ट म्हणजे दर दिवसाला तब्बल २.५ जीबी इतका डेटा मिळतो. या प्लामध्ये युजर्सना अनलिमिटेड ५ जी डेटा देखील मिळत आहे. याशिवाय कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसही देत आहे. या प्लानमुळे जिओ सिनेमासारखे जिओ अॅप्सही वापरता येतात.
एअरटेलचा ७७९ रुपयांचा प्लान
एअरटेल कंपनी देखील जिओप्रमाणे ५ जी सेवा देत आहे. त्यांचेही प्लान दमदार असून ७७९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी दिवसाला १.५जीबी डेटा मिळणार असून ५ जी नेटवर्क असणाऱ्या शहरात ५जी वापरता येईल. याशिवाय कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसही देत आहे. ९० दिवस व्हॅलिडिटी असणाऱ्या या प्लानमध्ये विंक म्यूझिकचं सब्सक्रिप्शनही मिळत आहे.
वाचा : ‘हे’ ८ Cryptocurrency Mining ॲप्स तुमच्या मोबाईलसाठी धोक्याचे, आताच करा डिलीट, नाहीतर होईल मोठं नुकसान
वोडाफोन-आयडियाचा ९०३ रुपयांचा प्लान
वोडाफोन-आयडिया कंपनीचा हा प्लानही ९० दिवस व्हॅलिडिटी असणारा आहे. यामध्ये दर दिवसाला कंपनी २ जीबी डेटा इंटरनेट वापरण्यासाठी युजर्सना देत आहे. तसंच अनलिमिटेड कॉलिंग आणि दर दिवसाला १०० एसएमएसही कंपनीकडून दिले जात आहे. विशेष म्हणजे यात ९० दिवसाचं सोनी लिव्हचा सब्सक्रिप्शनही कंपनीकडून दिलं जात आहे.
वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेश