नवी दिल्ली : Smartphone IMEI Number : बर्याच लोकांना आयफोन आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची खूप आवड असते. त्यात आजकाल स्मार्टफोनवर इतकी कामं होत असतात की प्रत्येकजण लेटेस्ट आणि महागडा फोन घेण्याचा विचार करतात. पण या महागड्या फोन्सची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते विकत घेता येत नाहीत. हाय प्राईमुळे हे मोबाइल वापरकर्ते कमी किंमतीत उपलब्ध असलेले सेकंड हँड मोबाइल फोन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अनेकजण एखाद्या मोबाईलच्या दुकानांमध्ये, ओएलएक्ससारख्या साईट्सवर तसंच ओळखींवाल्यांकडून असे सेकंड हडँड फोन विकत घेत असतात, त्यामुळे हवा तोच महागडा फोन कमी किंमतीत मिळतो. पण हे सेकंड हँड मोबाईल फोन घेण्यापूर्वी तो चोरीचा तर नाही ना? हे तपासणे आवश्यक आहे. ते कसे शोधायचे ते आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत…तुमचा फोन चोरीचा तर नाही?
तर फोन चोरीचा आहे की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात आधी त्याचा युनिक नंबर IMEI नंबर शोधा. कोणत्याही मोबाईल फोनची पहिली आणि खात्रीशीर ओळख म्हणजे त्याचा IMEI नंबर. हे मोबाईलचे जणून आधार कार्डच असते. त्यामुळे हा IMEI नंबर तपासून तुम्ही फोन चोरीचा आहे की नाही ते ठरवू शकता.तर IMEI नंबर तपासण्यासाठी पुढील स्टेप्स करा फॉलो…
तर फोन चोरीचा आहे की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात आधी त्याचा युनिक नंबर IMEI नंबर शोधा. कोणत्याही मोबाईल फोनची पहिली आणि खात्रीशीर ओळख म्हणजे त्याचा IMEI नंबर. हे मोबाईलचे जणून आधार कार्डच असते. त्यामुळे हा IMEI नंबर तपासून तुम्ही फोन चोरीचा आहे की नाही ते ठरवू शकता.तर IMEI नंबर तपासण्यासाठी पुढील स्टेप्स करा फॉलो…
- तुम्ही जो सेकंड हँड फोन खरेदी करणार आहात त्याचे डायल पॅड उघडा
- त्यात *#06# टाइप करा आणि कॉल बटण दाबा.
- वरील नंबर डायल करताच स्क्रीनवर IMEI नंबर दिसेल. त्याची नोंद घ्या.
- जर मोबाईल ड्युअल सिम असेल तर तुम्हाला दोन्ही सिमचे नंबर दाखवले जातील. ते लिहून ठेवा.
चोरीला गेलेला फोन कसा शोधाल?
५) आता तुमच्या फोनवर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर ही वेबसाइट उघडा. ही अधिकृत वेबसाइट उघडण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
६) होमपेजवरच मेनू टॅबमध्ये Application चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
7) येथे दिलेल्या पर्यायांमधून IMEI वेरिफिकेशन उघडा.
8) आता प्रमाणीकरणासाठी तुमचा मोबाईल नंबर टाका.
९) तुम्हाला मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल, त्याची पडताळणी करा.
10) OTP पडताळणीनंतर, तुम्हाला IMEI क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
11) येथे तुमच्या सेकंड हँड मोबाईलचा IMEI नंबर टाईप करा. (आपण आधी नोंद केलेला नंबर)
12) योग्य IMEI नंबर टाका आणि चेक बटण दाबा. तुमच्या सेकंड हँड फोनचे सर्व तपशील उघडपणे समोर येतील.
वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन