रेल्वेची कवच संरक्षण यंत्रणा आहे तरी काय?
कवच ही भारतीय रेल्वेने आरडीएसओ (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) द्वारे विकसित केलेली स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. २०१२ मध्ये रेल्वेने या प्रणालीवर काम सुरू केले. त्यावेळेस या प्रकल्पाचे नाव होते Train Collision Avoidance System (TCAS). ही प्रणाली विकसित करण्यामागील भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट शून्य अपघाताचे उद्दिष्ट साध्य करणे आहे. त्याची पहिली चाचणी २०१६ मध्ये झाली. त्याचा लाईव्ह डेमोही गेल्या वर्षी दाखवण्यात आला होता.
रेल्वे कवच कसे कार्य करते?
ही प्रणाली अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा संच आहे. यामध्ये रेल्वे, ट्रॅक, रेल्वे सिग्नल यंत्रणा आणि प्रत्येक स्थानकावर एक किलोमीटर अंतरावर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन यंत्रे बसवण्यात आली आहेत. ही प्रणाली अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे इतर घटकांशी संवाद साधते. लोको पायलटने सिग्नल पार करताच, कवच सक्रिय होते. यानंतर सिस्टम लोको पायलटला अलर्ट करते आणि नंतर ट्रेनच्या ब्रेकचा ताबा घेते. दुसरी ट्रेन रुळावर येत असल्याचे यंत्रणेला समजताच ती पहिल्या ट्रेनची हालचाल थांबवते.
ही यंत्रणा ट्रेनच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत असते. आता ही संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊ. या तंत्रज्ञानामुळे एकाच ट्रॅकवर दोन गाड्या येताच ही यंत्रणा दोन्ही गाड्या ठराविक अंतरावर थांबवते. दरम्यान ही यंत्रणा जर सर्व ट्रॅकवर सक्रीय झाल्यावर असा अपघात टाळता येऊ शकतो.
वाचा : Buying A Second Hand Phone: सेकंड हँड मोबाईल घेताय? पण फोन चोरीचा तर नाही ना? कसा कराल चेक?