भारतात काय आहे किंमत?
भारतात या १५ इंच मॅकबुक एअरची किंमत १,३४,९०० रुपये आहे. हा मिडनाईट, सिल्वर, स्पेस ग्रे आणि स्टारलाइट या रंगात उपलब्ध आहे. मॅक स्टुडिओ (२०२३) ची किंमत २,०९,९०० रुपये आहे. तर टॉवर एनक्लोजर आणि रॅक एनक्लोजर वाल्या मॅक प्रो ची किंमत अनुक्रमे ७,२९,९०० आणि ७,७९,००० रुपये अशी आहे.
वाचा : WWDC 2023: फक्त ‘या’ आयफोन मॉडेल्सनाच मिळणार iOS 17 अपडेट, पाहा संपूर्ण यादी
15 inch Macbook Air चे फीचर्स
या मॅकबुकमध्ये १५ इंचाचा ५०० नीट्स ब्राइटनेस असणारा डिस्प्ले आहे. हा लिक्विड रेटिना डिस्प्ले असून लॅपटॉप फक्त ११.५ मिमी इतकाच जाड आहे. यात युनिव्हर्सल ३.५ एमएम जॅक असून मॅगसेफ चार्जिंग, कनेक्टिंग एक्सेसरीज आणि थंडरबोल्ट पोर्ट आहे. कंपनीने याच 8 Core सीपीयू आणि 10 Core जीपीयू दिला आहे. तसंच क्लिअर कॉलिंगसाठी 1080p वेबकॅम आणि ३ माइक दिले आहेत.हा M2 अल्ट्रा चिपसेटसह येणारा मॅकबुक असल्याने इतर मॅकबुकच्या तुलनेत वेगवान आहे. हा मॅकबुक 800GBps इंटीग्रेटेड मेमरी बँडविड्थसोबत 192GB पर्यंतची विशाल मेमरी कॉन्फिगर करता येईल.
वाचा : 5G च्या युगात ही तुमचं इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’ टीप्स कराव्या लागतील फॉलो