Scholarship: शिष्यवृत्तीचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना ‘या’ गोष्टी माहिती असायला हव्यात

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

Scholarship:
१०वी, तसेच १२वीला विद्यार्थ्याला चांगले गुण मिळूनदेखील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना या अभ्यासक्रमांचे शुल्क कसे भरायचे ही विवंचना मध्यमवर्गीय पालकांसमोर नेहमीच असते. विद्यार्थी मग ते कोणत्याही जाती वा धर्माचे असोत, ते पारंपरिक तसेच व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हा विचार करून महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेसाठी जातीची अट नाही. ही योजना खालील विभागांतील अभ्यासक्रमांसाठी लागू आहे.

उच्च शिक्षण विभाग

•- उच्च शिक्षण विभागातील पारंपरिक अभ्यासक्रमांची १०० टक्के ट्युशन शुल्क (शासकीय, अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांसाठी) सरकार देते.

– पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख किंवा त्याहून कमी आहे : शासकीय व अनुदानित महाविद्यालयामधील १०० टक्के व विनाअनुदानित महाविद्यालयांतील ५० टक्के ट्युशन शुल्क राज्य सरकार देते.

– पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच ते आठ लाख : व्यावसायिक अभ्यासक्रमांचे ५० टक्के ट्युशन शुल्क सरकारकडून दिले जाते.

•परीक्षा शुल्क : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के, तर पारंपरिक अभ्यासक्रमांची १०० टक्के परीक्षा शुल्क राज्य सरकारकडून दिले जाते.

तंत्र शिक्षण विभाग

– पदविका : दहावीनंतर इंजिनीअरिंग डिप्लोमा, १२वीनंतर फार्मसी डिप्लोमा, १२ वीनंतर हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा

– पदवी : इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी, आर्किटेक्चर

– पदव्युत्तर पदवी : एमबीए/एमएमएस, एमसीए

वरील सर्व अभ्यासक्रमांचे ५० टक्के ट्यूशन शुल्क व ५० टक्के परीक्षा शुल्क राज्य सरकारकडून दिले जाते. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे व प्रवेश कॅपमधून होणे आवश्यक आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग

– पदवी : एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी व स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स व ऑर्थ्रोटिक्स, बी.एससी. (नर्सिंग)

– शासकीय अनुदानित, महापालिका संचालित, तसेच खासगी महाविद्यालयांमधील वरील अभ्यासक्रमांचे ५० टक्के शुल्क (शिक्षण शुल्क व विकास शुल्क) राज्य सरकारकडून दिले जाते. त्यासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

या योजनेबाबत सविस्तर माहिती महाराष्ट्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे विकसित करण्यात येणाऱ्या ‘महाडीबीटी’ या संकेतस्थळावरून घेता येईल. तसेच, यावरूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. शिष्यवृत्ती योजनेमध्ये काळानुसार बदल संभवतात. त्यामुळे अद्ययावत व सविस्तर माहितीसाठी https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ पाहावे. यावर अन्य शिष्यवृत्यांची माहितीही मिळेल.

Source link

College ScholarshipEducation FeeRajarshi Chhatrapati Shahu MaharajscholarshipScholarship DetailsShahu Maharaj Scholarship SchemeStudents Scholarshipशिष्यवृत्ती
Comments (0)
Add Comment