या स्कॅममध्ये एक फ्री लॅपटॉप मिळत असल्याचा मेसेज पाठवला जातो. त्यात भारत सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे आणि लोक अधिकृत वेबसाइटवर तपशील देऊन त्याचा लाभ घेऊ शकतात, असं सांगतात. पण मूळात ही लिंक फेक असून याद्वारे युजर्सची खाजगी माहिती चोरली जाते. ज्यामुळे सर्व पर्सनल माहिती स्कॅमर्सकडे जाते ज्यामुळे स्कॅमर्स बँक खातंही रिकामं करु शकतात. दरम्यान या मोफत लॅपटॉप स्कॅमबद्दल पीआयबीनेही तपासणी केली असून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सिद्ध झालं आहे. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना अशा कोणत्याही घोटाळ्याला बळी न पडण्याचा सल्ला दिला गेला आहे. भारत सरकार कोणत्याही विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप देत नाही, असं सांगितलं आहे.
सेफ राहण्यासाठी काय कराल?
जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला ज्यामध्ये भारत सरकार मोफत लॅपटॉप देण्याचे सांगितले जात आहे, तर तुम्हाला त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे लागेल. हे दावे खोटे आहेत. तसंच कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नये. असे तपशील शेअर केल्याने तुमच्या माहितीचा गैरवापरही होऊ शकतो. तसंच हा स्कॅम किंवा यासारखे इतर स्कॅम खरे आहेत कि खोटे हे तपासण्यासाठी, सरकारची अधिकृत वेबसाइट तपासणं कधीही चांगलं. जर येथे तपशील नसेल तर समजा हा एक घोटाळा आहे.
वाचा : WWDC 2023 : ॲपलनं आणला जगातील सर्वात स्लिम Macbook Air, पाहा १५ इंच मॅकबुकची किंमत आणि फीचर्स