Fake Call Alert : फेक व्हिडीओ कॉलमुळे होतेय अनेकांची फसवणूक, सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा’या’ स्टेप्स

नवी दिल्ली : Fake Video Calls : एकीकडे AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे. अवघड कामंही यामुळे सोपी होत असली तरी दुसरीकडे AI मुळे अनेक धोकेही जन्माला येत आहेत. हॅकर्स आणि स्कॅमर लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा फायदा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका बातमीत AI कॉलच्या मदतीने एका चीनमधील व्यक्तीला तब्बल ५ कोटी रुपयांना लुबाडल्याचं समोर आलं. फेक व्हिडीओ कॉलच्या मदतीनं ही फसवणूक झाली असून नेमका हा Fake Video Call Scam काय आहे आणि त्यापासून कसा स्वत:चा बचाव कराल? हे सारं जाणून घेऊ…

तर चीनमधील घटनेत एका व्यक्तीला बनावट AI व्हिडिओ कॉल महाग पडला. एका स्कॅमरने एआय पॉवर्ड फेस स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आणि व्हिडिओ कॉलवर ओळखीच्या व्यक्तीचा चेहरा टाकला आणि स्वतःला त्याचा मित्र म्हणू लागला. कॉल सुरू असताना स्कॅमरने त्या समोरील व्यक्तीला फसवलं आणि त्याच्या खात्यात त्वरित ५ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्या व्यक्तीने त्याच्या मित्राला याबाबत विचारले असता, मित्राने याबाबत नकार देताच हा फेक व्हिडिओ कॉल असल्याचं समोर आलं.

कसा ओळखाल फेक व्हिडिओ?
व्हिडिओ क्वॉलिटी: जेव्हा एखादी व्यक्ती AI च्या मदतीने चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ कॉल करते म्हणजेच फेक व्हिडिओ कॉल करते, तेव्हा या काळात व्हिडिओची क्वॉलिटी सामान्य कॉलच्या सारखी राहणार नाही. म्हणूनच व्हिडिओ क्वॉलिटी पहा आणि बॅकग्राउंड आणि आवाज देखील समजून घ्या.
संपर्क पडताळणी: कोणत्या प्लॅटफॉर्मवरून आणि कोणत्या नंबरवरून व्हिडिओ कॉल येत आहे हे तपासा. जर तुम्हाला नंबर माहित नसेल तर फोन उचलूच नका. तुम्ही कॉल उचलला तरीही, कोणतेही वैयक्तिक तपशील शेअर करू नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
एआय फेक व्हिडिओ कॉल टाळणे सोपे आहे. फक्त यासाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल.

वाचा : WWDC 2023 : ॲपलनं आणला जगातील सर्वात स्लिम Macbook Air, पाहा १५ इंच मॅकबुकची किंमत आणि फीचर्स

Source link

fake call scamfake callsfake video callvideo call scamफेक कॉलफेक व्हिडीओ कॉल
Comments (0)
Add Comment