6000mAh बॅटरी, 108MP कॅमेराचा सॅमसंगचा फोन भारतात लाँच, पाहा किंमत

सॅमसंगने आपला नवीन फोन Samsung Galaxy F54 5G ला भारतात लाँच केले आहे. नवीन फोन हा Samsung Galaxy M54 5G चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनला याच वर्षी मार्च मध्ये लाँच करण्यात आले होते. या फोन सोबत Exynos 1380 प्रोसेसर दिले आहे. तसेच या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि 25W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

फोनची किंमत
Samsung Galaxy F54 5G ला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. फोनला मिटओर ब्लू आणि स्टारडस्ट सिल्वर कलर मध्ये लाँच केले आहे. या फोनची विक्री आजपासून फ्लिपकार्टवर तसेच कंपनीच्या अधिकृत साइटवरून सुरू करण्यात आली आहे.

वाचाः Amazon ची शानदार EMI ऑफर, फक्त ५५ रुपये देऊन खरेदी करा कोणताही फोन

फोनची स्पेसिफिकेशन
सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. जो सुपर अमोलेड आहे. याचा डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. प्रोटेक्शनसाठी यात गोरिला ग्लास ५ दिले आहे. फोनमध्ये अँड्रॉयड १३ सोबत One UI 5.1 दिले आहे. फोनमध्ये 5nm Exynos 1380 प्रोसेसर दिले आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे.

वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट

या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात प्रायमरी लेन्स १०८ मेगापिक्सलचा आहे. यासोबत ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) दिले आहे. दुसरा कॅमेरा लेन्स ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा लेन्स २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. या फोनच्या फ्रंट मध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी सोबत 25W ची वायर चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

वाचाः फक्त २४० रुपयात Airtel चा १.५ जीबी डेटा प्लान, ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग

Samsung Galaxy M14 5G के ये फीचर्स बदल देंगे फोन चलाने का तरीका

Source link

Samsung Galaxy F54 5GSamsung Galaxy F54 5G 2023Samsung Galaxy F54 5G featuresSamsung Galaxy F54 5G priceSamsung Galaxy F54 5G saleसॅमसंग स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment