Acer Aspire Vero (2023) ते फीचर्स
तर हा Aspire Vero दोन प्रोसेसर पर्यायांमध्ये येतो. यात 13th Gen Intel Core i3/i5 प्रोसेसर आहे. 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज यासाठी उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये 14 इंच 1080 पिक्सेल डिस्प्ले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 16:9 आहे. हा डिस्प्ले Acer Technicolor Color Certification सह येतो. स्क्रीन-टू-बॉडी रेशो 80.01% आहे.
हा लॅपटॉप Windows 11 OS सह लाँच करण्यात आला आहे. एमएस ऑफिस होम आणि स्टुडंट सबस्क्रिप्शन देखील या डिव्हाइसमध्ये उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 720p इंटिग्रेटेड वेबकॅम आहे जो टेम्पोरल नॉइज रिडक्शनला सपोर्ट करतो. आवाजासाठी या मशीनमध्ये स्टिरिओ स्पीकर सेटअप आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. Acer Aspire Vero 2023 मध्ये डेटा ट्रान्सफरसाठी USB Type-C Thunderbolt 4 पोर्ट आहे आणि बाह्य मॉनिटर आउटपुटला सपोर्ट करतो. डिव्हाइसमध्ये एलईडी बॅकलिटसह कीबोर्ड आणि काचेचा ट्रॅकपॅड आहे. ट्रॅकपॅड मल्टी-जेश्चर आणि टू-फिंगर स्क्रोलिंगला सपोर्ट करतो. लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय, एक HDMI पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि दोन USB-A 3.2 पोर्ट डिव्हाइसमध्ये दिले गेले आहेत. Acer Aspire Vero मध्ये 50Wh बॅटरी आहे जी जलद चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
Acer Aspire Vero (2023) च्या Inter Core i3-1315U प्रोसेसर व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. तर इंटर कोअर i5-1335U प्रोसेसरसह हाय-एंड व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये आहे.
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान