Airtel चं सिम वापरता? प्लानमधील डेटा संपला, स्वस्तात करू शकता रिचार्ज, फक्त १९ रुपयांपासून किंमत सुरू

नवी दिल्ली : Airtel Data Plans : सध्या भारतात जिओसोबत दूरसंचार कंपनी एअरटेल ही आघाडीवर आहे. कारण या दोनच कंपन्या ५जी नेटवर्क पुरवत आहेत. दरम्यान जिओसह इतर कंपन्यांना टक्कर देण्याकरता एअरटेल अमर्यादित प्लान्ससह अशा अनेक योजना पुरवते, ज्यांची किंमतही कमी आहे आणि फायदेही चांगले आहेत. एअरटेल काही डेटा प्लान देखील अगदी स्वस्तात देत आहे. तर डेटा प्लान म्हणजे काय? तर तुमच्या सध्याच्या रिचार्जमधील दिवसाची डेटा मर्यादा संपल्यावर तुम्ही फक्त डेटा प्लान रिचार्ज करु शकता. एअरटेल अशा अनेक योजना ऑफर करते जे डेटा प्लान्स स्वस्तात येतात. तर अगदी १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत देखील डेटा प्लान मिळत असून त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

वाचा : Fake Call Alert : फेक व्हिडीओ कॉलमुळे होतेय अनेकांची फसवणूक, सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा’या’ स्टेप्स

१०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे डेटा प्लान :

  • १ जीबी डेटा १९ रुपयांमध्ये १ दिवसाच्या वैधतेसह उपलब्ध करून दिला जात आहे.
  • २९ रुपयांच्या प्लानमध्ये १ दिवसाच्या वैधतेसह २ जीबी डेटा उपलब्ध करून दिला जात आहे.
  • ४९ रुपयांचा प्लान देखील आहे, ज्यामध्ये १ दिवसाच्या वैधतेसह ६ जीबी डेटा उपलब्ध करून दिला जात आहे.
  • ५८ रुपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटाचा लाभ मिळतो. त्याची वैधता तुमच्या एक्सिटिंग प्लानइतकी असेल.
  • ६५ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला ४ जीबी डेटा दिला जात आहे. या योजनेची वैधता तुमच्या विद्यमान प्लानसारखीच आहे.
  • ९८ रुपयांचा प्लान आहे ज्यामध्ये ५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लानची वैधता सध्याच्या प्लानसारखीच आहे. यामध्ये विंक म्युझिक प्रीमियमचा फायदाही दिला जात आहे.
  • ६५ रुपयांचा प्लान T20 डेटा पॅक आहे. यासोबत तुम्हाला ४ जीबी डेटाचा लाभ मिळेल. तसेच, त्याची वैधता तुमच्या एक्सिटिंग प्लानइतकी असेल.

वाचा : WWDC 2023: फक्त ‘या’ आयफोन मॉडेल्सनाच मिळणार iOS 17 अपडेट, पाहा संपूर्ण यादी

Source link

AirtelAirtel Data Packairtel data plansairtel rechargeएअरटेलएअरटेल डेटा प्लान्स
Comments (0)
Add Comment