कंपनीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की नवीन Razr 40 मालिका Amazon, Reliance Digital स्टोअर्ससह सर्व प्रमुख रिटेल आउटलेटवर उपलब्ध करून दिली जाईल. यासोबतच या मालिकेतील फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरूनही खरेदी करता येईल. मोटोरोलाने ही मालिका नेमकी किती तारखेला लाँच केली जाईल हे सांगितलेले नाही… पण जुलै महिन्यात ही सिरीज लाँच होईल अशी माहिती समोर येत आहे.
Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra चे संभाव्य फीचर्स
या फोनचा बाहरेचा डिस्प्ले ३.६ इंच आहे. त्याचा रीफ्रेश रेट 144 Hz आहे. त्याच वेळी, फोनचा मुख्य डिस्प्ले ६.९ इंच आहे. दोन्ही फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. यातील पहिला सेन्सर १२ मेगापिक्सलचा असेल. हे कॅमेरे OIS सपोर्टसह येतील. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. तसंच ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देखील देण्यात आला आहे. त्याच वेळी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. दोन्ही फोन ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेऱ्यासह येतात. दोन्ही फोनमध्ये वेगवेगळे प्रोसेसर दिले गेले असते. Razr 40 Ultra मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. त्याच वेळी, Razr 40 मध्ये Snapdragon 7th Gen 1 SoC हा प्रोसेसर असणार आहे.
वाचा : Apple iphone 13 किंमतीत मोठी घट, १२८ जीबीचं मॉडेल २६,९९९ रुपयांना घेऊ शकता विकत, पाहा नेमकी डील