Asteroid News : १८,००० किमीच्या वेगाने लघुग्रह पृथ्वीच्यादिशेने, ६० फुट आकाराच्या या लघुग्रहाचा धोका किती?

नवी दिल्ली : Asteroid towards earth : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात नासा (NASA) ही अंतराळ संस्था कायमच पृथ्वीवासियांना पृथ्वीजवळ येणाऱ्या लघुग्रहांबाबत माहिती देत असते. आता देखील नासाने एका लघुग्रहाबाबत माहिती दिली असून विशेष म्हणजे हा तब्बल ११० वर्षानंतर एक लघुग्रह १८ हजार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पृथ्वीच्या जवळ येत असल्याची माहिती नासाने दिली होती. 2018 KR असं याचं नाव असून हा लघुग्रह पृथ्वीच्या २४.७ लाख किलोमीटर जवळपर्यंत येणार असून याचा आकार ६० फुट इतका असल्याचंही समोर आलं आहे. नासाची जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) लघुग्रहांचा मागोवा घेत आहे. जेपीएलनेच याबाबत माहिती दिली होती.

काय आहेत लघुग्रह?
नासाच्या मते, पृथ्वीची निर्मिती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली. पण पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी काही खडक सूर्यमालेत विखुरले गेले होते, त्यांनाच लघुग्रह असं नाव देण्यात आलं आहे. हे लघुग्रह सूर्याभोवती सतत फिरणाऱ्या ग्रहांच्या निर्मितीदरम्यान स्फोटांमुळे बनले असल्याचे म्हटले जाते. लघुग्रह हे खनिजांपासून बनलेले मोठे खडक आहेत. जेव्हा ते पृथ्वीच्या दिशेने खूप जवळ येऊ लागतात, तेव्हा नासा त्यांचा मागोवा घेते आणि त्यांच्यासाठी अलर्ट जारी करते.
वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
कसा ओळखतात लघुग्रहाचा धोका?
नासा तसंच इतर रिसर्च सेंटर्स लघुग्रहांचा धोका ओळकण्यासाठी टेलिस्कोप तसंच NEOWISE सारखे observatories वापरत असतात. यांनी लघुग्रहांना ट्रॅक केलं जातं.

वाचा : तुमची बच्चे कंपनी मोबाईलवर काय पाहते? यावर तुम्ही ठेवू शकता कंट्रोल, ‘या’ आहे पाच सोप्या टिप्स

Source link

Asteroidasteroid on earthearthNasaspaceनासापृथ्वीलघुग्रह
Comments (0)
Add Comment