वादग्रस्त वक्तव्यानंतर भडकले शिवसैनिक; दत्तात्रय भरणेंकडून दिलगिरी

हायलाइट्स:

  • दत्तात्रय भरणे यांचं मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य
  • शिवसैनिकांनी भरणेंवर केला जोरदार पलटवार
  • अखेर दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली दिलगिरी

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्याची सुरुवात प्रभाग क्रमांक पाचमधील देगाव रोड येथील ४३ एकर जागेवर मनपा गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून झाली. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (NCP Dattatray Bharane) यांच्या हस्ते संपन्न झाला. याच कार्यक्रमात दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मोठं वादंग निर्माण झालं.

आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचं भरभरुन कौतुक केलं. त्यांना मुख्यमंत्री व्हा अशा शुभेच्छा दिल्या. त्यावर पालकमंत्री भरणे यांनी, ‘चंदनशिवेदादा मला खूप कांही मिळालं आहे.म्हणून तुम्हाला काय द्यायचं आहे तो आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या, असं आवाहन केलं. तर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी एका प्रकल्पासाठी भरणे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे निधी मागा, अशी मागणी केल्यानंतर ‘मुख्यमंत्री जाऊद्या मरू द्या…हे काम आपलं आपण करू, नंतर मुख्यमंत्र्यांकडे मोठा निधी मागू,’ असं वक्तव्य केले.

सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजपा आमने-सामने; एकाच प्रकल्पाचे दोन वेळा भूमिपूजन

विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी आवाक् झाले. दरम्यान सदरचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ग्रामीण भाषेतील वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले.

शिवसेनेकडून जोरदार पलटवार

शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची औकात काढत खडेबोल सुनावले. तसंच सोलापूर जिल्ह्यात फिरु न देण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रकरण चिघळल्याचे लक्षात येताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला. पण वक्तव्य व्हायरल झाल्याने शेवटी त्यांनी आपला माफीनामा सादर केला.

‘मी मुख्यमंत्र्यांचा आदर करतो. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला,’ असं स्पष्टीकरण देत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Source link

Dattatray Bharanesolapur newsदत्तात्रय भरणेशिवसेनासोलापूरसोलापूर न्यूज
Comments (0)
Add Comment