जर्मन ब्रँड Blaupunkt ने भारतीय बाजारात एकाचवेळी अनेक स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. ज्यात ३२ इंच पासून ७५ इंच पर्यंतच्या टीव्हीचा समावेश आहे. या टीव्हीत एचडी, फुल एचडी, आणि अल्ट्रा एचडी रिझॉल्यूशन मिळेल. कंपनीने या टीव्हीच्या विक्रीसाठी फ्लिपकार्ट सोबत पार्टनरशीप केली आहे. या टीव्हीची विक्री १४ जून २०२३ पासून सुरू केली जाणार आहे. या टीव्हीला ६ हजार ४९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते. ३२ इंच, ४० इंच, ४३ इंच टीव्ही सोबत Realtek Gen 2 चिपसेटचा वापर केला आहे. या टीव्हीची किंमत अनुक्रमे १० हजार ८८८ रुपये, १६ हजार ४९९ रुपये, १८ हजार ४९९ रुपये आहे. सर्व टीव्हीत इनबिल्ट नेटफ्लिक्स मिळेल.
या टीव्ही सोबत 48W चे दोन स्पीकर दिले आहेत. या सोबत सराउंड टेक्नोलॉजी दिली आहे. या टीव्हीत १ जीबी रॅम आणि ८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. हे टीव्ही अँड्रॉयड ११ सोबत येतात. कनेक्टिविटीसाठी टीव्हीत 3 HDMI आणि 2 USB पोर्ट शिवाय, Amazon Video, Zee5, Sony LIV आणि Voot सारखे अॅप्स प्री इंस्टॉल मिळतील. Blaupunkt च्या ५० इंच आणि ६५ इंचाच्या टीव्हीची किंमत २८ हजार ९९९ रुपये आणि ४४ हजार ४४९ रुपये आहे. या टीव्ही सोबत २ जीबी रॅम आणि १६ जीबीचे स्टोरेज मिळते. या टीव्हीत MT9062 प्रोसेसर दिले आहे.

वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट
Blaupunkt च्या ७५ इंच QLED TV टीव्हीची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्ही सोबत QLED 4K डिस्प्ले मिळतो. यात 60w चा डॉल्बी स्पीकर मिळतो. यात चार स्पीकर दिले आहे. या सोबत HDR 10+, DTS TruSurround, डॉल्बी व्हिजन, डॉल्बी एटमॉस आणइ डॉल्बी डिजिटल प्लसचा सपोर्ट मिळतो.
वाचाः Acer चा ३२ इंचाचा एचडी स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त ३ हजारात, ग्राहकांची गर्दी