किती आहे मासिक शुल्क?
तर Meta ने भारतीय वापरकर्त्यांसाठी मासिक सबस्क्रिप्शनची किंमत ६९९ रुपये निश्चित केली आहे. या किंमतीत तुम्हाला मोबाइल ॲप्सवर वेरिफिकेशन सेवेचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे Android आणि Apple iPhone वापरकर्त्यांसाठी दोघांसाठी ही किंमत समान आहे. कंपनी येत्या काही दिवसांत वेब वापरकर्त्यांसाठी मोबाइल अॅपसाठी सुरू केलेली वेरिफिकेशन सेवा देखील रोलआउट करेल आणि वेब वापरकर्त्यांसाठी सत्यापित सेवेची किंमत ५९९ रुपये प्रति महिना असेल अशीही माहिती समोर येत आहे.
कशी खरेदी कराल ही सेवा?
तर वापरकर्ते थेट Instagram किंवा Facebook ॲपद्वारे मेटा व्हेरिफाईड सेवा खरेदी करु शकणार आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना वेरिफायड खाते सदस्यता खरेदी करण्यासाठी सरकारी आयडीचा पुरावा द्यावा लागेल. व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना अकाउंट सपोर्टसह अनेक विशेष फीचर्सचा लाभ मिळणार आहे.
आधीच वेरिफायड युजर्सचं काय होणार?
तसंच मेटाने युजर्ससाठी व्हेरिफाईड अकाऊंट सर्व्हिस सुरू केली आहे, पण यासोबतच अनेक प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत जसे की ज्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सकडे आधीच व्हेरिफाइड बॅज आहेत त्यांचे काय होणार? तर त्यांचे बॅज कंपनी काढून टाकणार असून सब्सक्रिप्शन घेणाऱ्यांनाच ही सेवा मिळेल.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो