WhatsApp Channels Feature : व्हॉट्सॲपचं नवं चॅनल्स फीचर लाँच, काय आहे खास?

नवी दिल्ली : WhatsApp Channels : इन्स्टट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने फायनली आपलं ‘चॅनल्स’ हे नवीन फीचर सादर केलं आहे. या चॅनल्स फीचरच्या मदतीने एकाच वेळी अनेकांना व्हॉट्सॲपद्वारे विविध गोष्टी पाठवता येतील. म्हणजेच एकावेळी एका मोठ्या ग्रुपमध्ये मेसेज (फोटो, व्हिडीओ) प्रसारित केला जाऊ शकतो. तर व्हॉट्सॲप चॅनल्स हे फीचर कॉलेज, कंपन्या आणि विविध संस्थासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.

या चॅनेल्स फीचरच्या लाँचबाबत व्हॉट्सॲपने सांगितले की, व्हॉट्सॲपवर थेट एकाच चॅटमध्ये अनेकांना महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी हे बेस्ट फीचर आहे. सध्या ‘चॅनल्स’ ला ‘अपडेट्स’ नावाच्या नवीन टॅबवर आणलं जात असून जिथे तुम्हाला ‘स्टेटस’ दिसतात. तिथेच तुम्ही फॉलो केलेले चॅनेल पाहू शकता. व्हॉट्सअॅप चॅनेल फीचर कोलंबिया आणि सिंगापूरमध्ये लाँच केले गेले आहे आणि लवकरच भारतासह अन्य देशांमध्ये आणले जाईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.

वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

व्हॉट्सॲप चॅनल्स म्हणजे नेमकं काय?
व्हॉट्सॲप चॅनेल हा एक प्रकारचा मोठा ग्रुपच आहे. ज्याला तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. पण यात सर्वचजण मेसेज पाठवू शकतील कि नाही हे अद्याप नेमके स्पष्ट नसून सध्यातरी ग्रुप ॲडमिन प्रमाणे ठरावीक व्यक्तीच मजकूर, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि मतदान पाठवू शकणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही चॅनल फॉलो करू शकता. यासाठी, एक खास लिस्ट देखील तयार केली जाईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे छंद, क्रीडा संघ, स्थानिक अधिकारी यांचे अपडेट मिळतील. विशेष म्हणजे तुमचा फोन नंबर चॅनेलचा ॲडमिन किंवा इतर फॉलोअर्सना दिसणार नाही.
वाचा : तुमची बच्चे कंपनी मोबाईलवर काय पाहते? यावर तुम्ही ठेवू शकता कंट्रोल, ‘या’ आहे पाच सोप्या टिप्स

:

Source link

WhatsAppwhatsapp channelsWhatsApp featureWhatsApp updateव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप फीचर
Comments (0)
Add Comment