Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोन आधीच चीनमध्ये लाँच झाले आहेत. अशा परिस्थितीत या स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन आधीच समोर आले होते. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये, 120Hz चे रिफ्रेश दर FHD + रिझोल्यूशनसह दिसतील. या उपकरणांमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेट वापरला जाईल. Realme च्या या सीरीजचे दोन्ही फोन Android 13 OS सह Realme UI 4.0 वर काम करतील.
कसा आहे कॅमेरा?
Realme 11 Pro मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसेल, ज्यामध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल. तर Realme 11 Pro + फोनमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 200MP कॅमेरा दिला जाईल. यामध्ये, दुय्यम कॅमेरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे आणि तिसरा सेन्सर 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. यात 32MP सेल्फी कॅमेरा आहे.
किंमतीचं काय?
Realme 11 Pro कंपनीने तीन कॉन्फिगरेशनमध्ये लॉच केला आहे. त्याच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. त्याच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. हे फोन १६ जुलै रोजी Realme.com, Flipkart.com आणि रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान