Vi च्या ९०२ रुपयांच्या प्लानची संपूर्ण माहिती
- नवीन Vi Unlimited रिचार्ज प्लानची किंमत ९०२ रुपये असून त्याची वैधता ९० दिवसांची आहे.
- हा प्लान कंपनीच्या साइटवर “अनलिमिटेड” टॅब अंतर्गत सूचीबद्ध आहे.
- यामध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ ९० दिवसांसाठी उपलब्ध आहे.
- दररोज 2GB डेटा म्हणजेच एकूण 180GB डेटा प्लानमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.
- रिचार्ज वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएस देखील देतो जे तुम्ही तुमचे आवडते इन्स्टंट मेसेजिंग अॅप नीट काम करत नसेल तर इमरजन्सीमध्ये वापरु शकता.
- OTT सबस्क्रिप्शनचा लाभही या रिचार्जमध्ये आहे.
- मोफत कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त, SunNXT वापरकर्त्यांना विनामूल्य सदस्यता देखील प्रदान करते. या सदस्यत्वाची वैधता ९० दिवसांपर्यंत आहे.
वीकेंड डेटा रोलओव्हर आणि नाईट डेटा फायदे
या रिचार्ज प्लानमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि नाईट डेटा फायदे देखील उपलब्ध आहेत. वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये, ग्राहक सोमवार ते शुक्रवार शनिवार आणि रविवारी दररोजच्या डेटामधून उर्वरित इंटरनेट वापरू शकतात. तसेच, नाईट डेटा बेनिफिटबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लान रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान अमर्यादित इंटरनेट सुविधा देतो. या वेळी वापरलेला डेटा तुमच्या दैनंदिन डेटा कोट्यापेक्षा वेगळा आहे.
वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये