अशाप्रकारे साईट्स डाऊन झाल्याची अर्थात आउटेजचा मागोवा घेणारी साइट डाउनडिटेक्टरने या गोष्टीची पुष्टी केली आहे. रिपोर्टनुसार, ५६ टक्के यूजर्सना इन्स्टाग्राम अॅपमध्ये समस्या येत आहेत, तर २३ टक्के यूजर्सना लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. २१ टक्के युजर्सनी सर्व्हर एररची तक्रार देखील केली आहे. इन्स्टाग्राम व्यतिरिक्त, अनेक फेसबुक वापरकर्त्यांनी देखील आउटेजबद्दल तक्रार केली आहे. फेसबुक वापरकर्त्यांची टाइमलाइन रिफ्रेश होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
महिन्याभरात दुसऱ्यांदा आला इश्यू
विशेष म्हणजे एका महिन्यात इन्स्टाग्रामवरील हा दुसरा आउटेज आहे. याआधी गेल्या महिन्यात २१ मे रोजीही इन्स्टाग्राम अनेक तास ठप्प झाले होते. इन्स्टाग्राममधील तांत्रिक दोषामुळे हे घडत असल्याचे समोर येत आहे. इन्स्टाग्रामच्या या बगमुळे जगभरातील १,८०,००० युजर्सना त्रास सहन करावा लागला आहे. Downdetector.com ने दिलेल्या अहवालात त्यांनी म्हटले आहे की, यूएस मध्ये फक्त १००,००० वापरकर्ते, कॅनडामध्ये २४,००० आणि यूकेमध्ये ५६,००० युजर्सना यामुळे त्रास झाला आहे. या सर्वाबद्दल सोशल मीडियावर युजर्सच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत….
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान