Jio Recharge : एकदा रिचार्ज आणि तीन महिने टेन्शन नाही, कॉलिंगसह दमदार डेटाही, पाहा नेमकी ऑफर?

नवी दिल्ली :Jio Best Recharge Pack : सध्याच्या डिजीटल युगात युजर्सच्या वाढत्या गरजांसाठी सर्वच टेलिकॉम कंपन्या एकापेक्षा एक रिचार्ज ऑफर घेऊन येत आहेत. जिओ मंथली रिचार्ज करणाऱ्यांसाठी तसंच वार्षिक रिचार्ज करणाऱ्यांसाठीही दमदार रिचार्ज घेऊन येत असतात. पण ज्यांना वर्षाचा रिचार्ज करायचा नाही आणि दर महिन्याला रिचार्जचं टेन्शन नको आहे, त्यांच्यासाठी खास ९० दिवसांचा म्हणजेच तीन महिन्यांचा खास प्लान आणला आहे. हे प्लान ७४९ आणि ८९९ अशा दोन किंमतीत असून चलातर दोन्ही रिचार्जबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

जिओचा ७४९ रुपयांचा प्लान

या यादीत ७४९ रुपयांचा एक प्लान आहे, जो युजर्सना ९० दिवसांसाठी २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतो. तसंच दरदिवसासाठी १०० एसएमएसची सुविधाही या प्लानमध्ये आहे. याशिवाय हा प्लान JioTV,
JioCinema, JioCloud आणि JioSecurity असे अतिरिक्त फायदेही मिळणार आहेत. प्लानमधील इंटरनेट डाटा संपल्यावर नेटची स्पीड 64Kbps इतकी कमी होईल.
वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच
जिओचा ८९९ रुपयांचा प्लान
या तील दुसरा प्लान हा ८९९ रुपयांचा असून या प्लानमध्येही ७४९ रुपयांचा प्लानमधील फायदे आहेत. पण प्लानमध्ये युजर्सना ९० दिवसांसाठी २.५ जीबी डेटा मिळतो. तसंच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा कपनीने दिली असून दरदिवसासाठी १०० एसएमएसची सुविधाही या प्लानमध्ये आहे. याशिवाय हा प्लान JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity असे अतिरिक्त फायदेही मिळणार आहेत. तर एकंदरीत विचार केल्यास हे दोन्ही प्लान ९० दिवसांसाठी रिचार्ज शोधणाऱ्यांसाठी बेस्ट आहेत.

जिओचा फक्त ३९९ रुपयांत फॅमिली प्लानही
जिओचा ३९९ रुपयांचा एक प्लान आहे ज्यामध्ये घरातील तीन सदस्य जोडता येतील. प्रत्येक सदस्यानुसार अधिक ९९ रुपये वेगळे भरावे लागतील. या प्लानमध्ये ७५ जीबी डेटा दिला जाईल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० मेसेजची ऑफर दिली जात आहे. ही योजना ४ सदस्यांसह सुमारे ६९४ रुपयांची आहे.

वाचा : ChatGPT चे क्रिएटर सॅम ऑल्टमन यांनी घेतली PM मोदींची भेट, AI संबधित विषयांवर झाली खास चर्चा

Source link

jiojio prepaid packjio rechargeReliance Jioजिओजिओ नेटजिओ प्रिपेड प्लान
Comments (0)
Add Comment