Disney Plus Hotstar ने केली घोषणा
Disney Plus Hotstar चे प्रमुख साजिथ शिवनंदन यांनी एक्सचेंज4 मीडियाला दिलेल्या माहितीत सांगितले की, Disney Plus Hotstar भारतात वेगात विकसित होत आहे. ओटीटीमध्ये अगदी आघाडीवर असून आपल्या ग्राहकांना अधिक आनंद देण्याकरता कायम प्रयत्न करत आहे. आता आगामी क्रिकेट टूर्नामेंट आशिया कप आणि वर्ल्डकप कोट्ववधी जनतेसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी हे पाऊल उचलत आहे.
जिओ सिनेमामुळे हॉटस्टारनं उचललं पाऊल
यंदाची आयपीएल २०२३ जिओ सिनेमाने सर्व नेटवर्कसाठी आपल्या जिओसिनेमा अॅपवर मोफत दाखवली. एवढी भव्य स्पर्धा मोफत जिओने दाखवल्यानंतर त्यांची व्ह्यवरशिप मोठ्या प्रमाणात वाढली. त्यात रिलायन्स जिओने २०२३ ते २०२७ पर्यंत आयपीएलचे राईट्स विकत घेतले असल्याने इतर टूर्नामेंटसाठी प्रेक्षक वाढवण्याकरता हॉटस्टारनं हे पाऊल उचललं आहे.
वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये