आजचे पंचांग आणि दिनविशेष १० जून २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Jun 2023, 4:11 am

Daily Panchang In Marathi: शनिवार १० जून २०२३, भारतीय सौर २० ज्येष्ठ शके १९४५, ज्येष्ठ कृष्ण सप्तमी दुपारी २-०२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका दुपारी ३-३८ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: मृग,

 

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ २०, शक संवत १९४५, ज्येष्ठ, कृष्ण, सप्तमी, शनिवार, विक्रम सम्वत् २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे २७, जिल्काद २०, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १० जून २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु. राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत.सप्तमी तिथी दुपारी २ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. शतभिषा नक्षत्र दुपारी ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्र प्रारंभ. विष्कुंभ योग दुपारी १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रिती योग प्रारंभ. बव करण दुपारी २ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-०२,

सूर्यास्त:

सायं. ६-१४,

चंद्रोदय:

उत्तररात्री १-०१,

चंद्रास्त:

दुपारी १२-१०,

पूर्ण भरती:

पहाटे ४-२५ पाण्याची उंची ३.५५ मीटर, सायं. ५-१५ पाण्याची उंची ४.१९ मीटर,

पूर्ण ओहोटी :

सकाळी १०-२२ पाण्याची उंची १.३० मीटर, रात्री ११-४८ पाण्याची उंची १.६४ मीटर.

दिनविशेष:

कालाष्टमी, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान देहू, जागतिक दृष्टिदान दिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :

ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४२ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४० मिनिटे ते ३ वाजून ३६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजेपासून ते १२ वाजून ४१ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून ५४ मिनिटे ते १० वाजून २४ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटे ते ६ वाजून १८ मिनिटापर्यंत. यानंतर ६ वाजून १८ मिनिटे ते ७ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय:

शनि चालीसाचा पाठ करा, आणि पिंपळाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

– आचार्य कृष्ण दत्त शर्मा

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 10 june 2023आजचे पंचांगआजचे पंचांग १० जून २०२३कालाष्टमीदिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योगसंत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान देहू
Comments (0)
Add Comment