आषाढी वारी 2023: संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा, टाळ मृदंगावर वारकऱ्यांनी धरला ठेका

२९ जूनला आषाढी एकादशी

आषाढ महिना लागला की आषाढी एकादशी आणि आषाढी वारीच्या सोहळ्याचा आनंद पहावयास मिळतो. गुरुवारी २९ जूनला आषाढी एकादशी असून, वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा

त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक व काकड आरती करून सुरुवात करण्यात आली. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजे नंतर पालखी सोहळ्याचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादूकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.

​३३८ वा पालखी सोहळा​

आजपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळयाला सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा ३३८ वा पालखी सोहळा आहे.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होणार आहे. आज पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी शिळा मंदिर येथे अभिषेक झाला.

फुगड्या आणि टाळ मृदंगावर वारकऱ्यांचा ठेका

यावेळी उत्साहात पारंपारिक फुगड्या आणि टाळ मृदंगावर वारकऱ्यांनी ठेका धरला. पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या वारकऱ्यांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

इंद्रायणी नदीकाठी वारकऱ्यांचा मेळा

देहू येथे जमलेल्या वारकऱ्यांनी यावेळी इंद्रायणी नदीकाठी आंघोळ केली. यावेळी इंद्रायणी नदीचा घाट आणि परिसर सर्व आलेल्या वारकरी मंडळींच्या गर्दीने भरून गेला.

Source link

ashadhi ekadashi vari 2023ashadhi vari maharashtra in marathiashadhi vari pandharpurpalkhi sohalasant tukaram maharajआषाढी एकादशीआषाढी वारीपंढरपूर आषाढी वारीसंत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळासंत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा
Comments (0)
Add Comment