विशेष म्हणजे या पोर्टलच्या मदतीने आतापर्यंत २.५ लाखांहून अधिक स्मार्टफोन्सचा शोध घेण्यात आला आहे. या पोर्टलच्या मदतीने ५.४ लाखाहून अधिक फोन ब्लॉक करण्यात आले आहेत. टेलिकॉम वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी या पोर्टलमध्ये तीन सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांची डिजिटल ओळख संरक्षित करण्यात आणि फोन ट्रॅक किंवा ब्लॉक करण्यात मदत होत आहे. हे पोर्टल AI च्या मदतीने काम करते. चलातर या पोर्टलबद्दल अधिक माहिती आणि याचा वापर कसा करुन घ्यायचा ते जाणून घेऊया.
एका महिन्यात शोधले २.५ लाखांहून अधिक फोन
लाँच झाल्याच्या पहिल्या एका महिन्यातच, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या (CEIR) संचार साथी पोर्टलला हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या फोनबद्दल खूप तक्रारी आल्या. या पोर्टलच्या मदतीने, स्मार्टफोन वापरकर्त्यांना ५४१,४२८ मोबाइल फोन ब्लॉक करण्यात आणि २५५,८८२ हरवलेल्या डिव्हाइसेसचा शोध देखील लागला. हे पोर्टल १६ मे रोजी सुरू करण्यात आले असून एका महिन्यातच ही कमाल पोर्टललने केली आहे. तर या पोर्टलच्या मदतीनं वापरकर्ता डिव्हाइसचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (IMEI) ब्लॉक करू शकतात, जे फोनमध्ये नवीन सिम कार्ड टाकलं तरीही फोन निरुपयोगी ठरतो. फोन वापरला जाऊ शकत नाही, त्यानंतर त्याचं काही काम उरत नाही.
कसा कराल फोन ब्लॉक किंवा ट्रॅक?
- फोन शोधण्यासाठी तुम्हाला संचार साथी पोर्टलवर जावे लागेल.
- पोर्टलवर, तुम्हाला फोनवरील “ब्लॉक स्टोलेन/लॉस्ट मोबाईल” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला फोनशी संबंधित माहिती द्यावी लागेल. जसे मॉडेल नंबर, कंपनी, IMEI नंबर इत्यादी
- त्यानंतर चोरीचे ठिकाण आणि तारीख, पोलिस एफआयआर क्रमांक आणि एफआयआर कॉपी अपलोड करावी लागते.
- त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती एंटर करावी लागेल, ज्यामध्ये सरकारी आयडी क्रमांक, नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर समाविष्ट असेल.
- सर्व माहिती दिल्यानंतर CEIR तुमचा फोन ट्रॅकिंगवर ठेवेल. यानंतर, तुमच्या फोनमध्ये दुसरे सिम वापरताच, त्याचे लोकेशन ट्रेस केले जाऊ शकते. तसंच ब्लॉकचा ऑप्शनही असतो.
वाचाः आजपासून फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल सुरू, या स्मार्टफोन्सवर १४ जूनपर्यंत ऑफर