Reliance Jio ने म्युझिक प्रेमींसाठी ‘JioSaavn Pro’ सबस्क्रिप्शनसह बंडल प्रीपेड योजना लाँच केल्या आहेत. जिओचे नवीन प्लान मोबाईल कनेक्टिव्हिटीसह ग्राहकांच्या म्युझिक सबस्क्रिप्शनच्या गरजा पूर्ण करतील. ‘JioSaavn Pro’ च्या सबस्क्रिप्शनसह, ग्राहकांना अमर्यादित JioTunes, अमर्यादित डाउनलोड आणि उच्च दर्जाचे ऑडिओ मिळेल आणि तेही कोणत्याही जाहिरातीशिवाय अगदी विनामूल्य. Jio सावन चे सबस्क्रिप्शन ९९ रुपये प्रति महिना उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओ नवीन प्रीपेड योजना
या नवीन ‘JioSaavn Pro’ सदस्यता योजना २६९ पासून सुरू होते ज्याची वैधता २८ दिवस ते ८४ दिवसांच्या व्हॅलिडिीसह येतो. यात दररोज १.५ जीबी डेटा आणि तर हा २८ दिवसांची वैधता असलेला प्लॅन २६९ रुपयांना उपलब्ध असेल, तर ५६ दिवसांच्या वैधतेच्या याच प्लानसाठी ग्राहकांना ५२९ रुपये मोजावे लागतील. जर ग्राहकांना त्याच प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता हवी असेल तर त्याला ७३९ रुपये द्यावे लागतील.
नवीन आणि जुने दोन्ही प्रीपेड वापरकर्ते ‘JioSaavn Pro’ सदस्यता योजनेचा लाभ घेऊ शकतात. सक्रिय रिचार्ज प्लॅन असलेले ग्राहक Jio-Saavn वर स्विच करू शकतील. प्लान रिचार्ज केल्यानंतर, वापरकर्त्यांना Jio-Saavn अॅप डाउनलोड करावे लागेल आणि साइन इन करावे लागेल. ग्राहक अॅप सेटिंग्जमध्ये त्यांच्या पसंतीची संगीत भाषा सहजपणे सेट करू शकतात.
वाचाः अखेर ट्रॅफिक पोलिसवाले कसे काढतात तुमच्या बाइक किंवा कारचा क्लियर फोटो?, पाहा या टिप्स